मुंबई- अजामीनपात्र वॉरंट काढण्या आगोदार इडीने शेवटची संधी म्हणून 31 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश झाकीर नाईकला देण्यात आले होते. मात्र यावर पुन्हा एकदा झाकीर नाईकने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडून अटक न होण्याची लेखी हमी मिळत असेल, तर मी भारतात येईन असे पुन्हा म्हटले आहे.
देशातील महत्वाच्या समस्यांवरून लक्ष हटविण्यासाठी माझ्या नावाचा वापर - झाकीर नाईक
इडीने शेवटची संधी म्हणून 31 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश झाकीर नाईकला देण्यात आले होते. मात्र यावर पुन्हा एकदा झाकीर नाईकने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपल्या अटी सादर केल्या.
झाकीर नाईकने त्याच्या पत्रकात म्हटले आहे, की माझ्या विरोधात या अगोदरही 2017 मध्ये वॉरंट काढण्यात आले होते. तेव्हा पुन्हा वॉरंट का काढण्यात येत आहे, हे माझ्या समजण्यापलिकडे आहे. हे केवळ आणि केवळ माझे नाव सतत प्रकाशझोतात आणून देशात सुरू असलेल्या महत्वाच्या समस्यांवरून लक्ष हटविण्यासाठी केलेला प्रयत्न आहे, असे झाकीर नाईकने म्हटले आहे.
झाकीर नाईकने पुन्हा म्हटले आहे, की त्याला भारताच्या कायद्यावर विश्वास आहे. मात्र येथील कायदेशीर प्रणालीवर तो विश्वास ठेवत नाही. भारतातील गेल्या काही वर्षात घडलेल्या घडामोडीत पाहायला मिळाले आहे, की काही मुस्लीमांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे नोंदवून 8 ते 20 वर्षांसाठी तुरुंगात टाकण्यात आले आहे. यावरून मला कुठललीही जोखीम घ्यायची नसल्याचे झाकीर नाईकने म्हटले आहे. झाकीर नाईकने पुन्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडून त्याला भारतात आल्यावर कुठलीही अटक न करता तुरुंगात टाकले जाणार नाही, अशी लेखी हमी मिळत असेल, तर तो भारतात यायला तयार आहे. भारतात आल्यावर मी न्यायालयातील सुनावणीसाठी स्वतःहून हजर राहील असे झाकीर नाईकने म्हटले आहे.