मुंबई -मागील रविवार पासून मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ( Police Commissioner Sanjay Pandey ) यांनी संडे स्ट्रीट ( Sunday Streets In Mumbai ) हा उपक्रम सुरु केला आहे. त्यामुळे रविवारची सकाळ अजून स्पेशल झालेली आहे. या सकाळचा फायदा फक्त व्यायामासाठी, मनोरंजनासाठी नाही तर एका चांगल्या उपक्रमासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. हे दाखवून दिले आहे, ईशा फाउंडेशनने. ईशा फाउंडेशन हे माती वाचवा यासाठी काम करते. सामान्य नागरिकांना फक्त त्यांच्या फलका बरोबर एक फोटो घ्यायचा आहे. तो फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करायचा आहे. मात्र, ज्या मातीची नासाडी सध्या होत आहे. जी माती मरत चालली आहे. ती माती पुन्हा जिवंत ठेवण्यासाठी हा उपक्रम फार महत्त्वाचा आहे. याचाच प्रत्यय मरीन ड्राईव्ह येथे दिसून आला.
...तर आपल्या शरीराचे काय - आजच्या धावपळीच्या जगात स्वतःच्या तब्येतीकडे बघायला माणसाला वेळ नाही आहे. जरी वेळ असला तरी सुद्धा त्याच्या खोलात जायला तो तयार नाही. थोडक्यात विषय आहे मातीचा. माती जगण्यासाठी किती महत्वाची आहे हे समजण्याचा प्रयत्न क्वचित कोण करत असते. परंतु, ही माती म्हणजेच प्राण आहे, हे सांगण्याचा प्रयत्न ईशा फाऊंडेशनचे कार्यकर्ते मरीन ड्राईव्ह येथे करत आहेत. मातीतून जी सत्व भेटतात तीच पिकांमधून व जेवणाच्या माध्यमातून आपल्या शरीरात जात असतात. पण,या मातीतली सत्व जर नष्ट झाली, तर आपल्या शरीराचे काय यासाठी जगभरातून या विषयावर लक्ष द्यायला हवे.
माणसाला जगण्यासाठी जशी श्वासाची गरज असते तसे... - हा गंभीर प्रश्न सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे म्हणून ईशा फाउंडेशनचे कार्यकर्ते हातात फलक घेऊन लोकांना त्यांच्याबरोबर एक फोटो काढण्यासाठी आग्रह करताना दिसत आहेत. हा फोटो काढल्यावर त्यांनी सोशल मीडियावर शेअर करायचा आणि या उपक्रमाविषयी जनजागृती करायची एवढीच त्यांची साधी इच्छा आहे. शेतकरी सदन झाला पण माती मेली? याविषयी सांगायचे झाले तर जीवनासाठी अत्यंत गरजेचा व निगडीचा असा हा मातीचा उपक्रम राबवला जात आहे. माणसाला जगण्यासाठी जशी श्वासाची गरज असते तसेच या पंच महाभूतांमधील एक असलेली माती हिला सुद्धा श्वासाची गरज असते. आत्ता ज्या पद्धतीने शेतीची शैली बदलली आहे.