मुंबई- 'इकबाल मिर्ची'चा हस्तक हुमायून मर्चंटला मंगळवारी ईडीने अटक केली होती. त्यानंतर ईडी न्यायालयात हजर केले असता, हुमायून यास 24 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हुमायून मर्चंटकडे दाऊदचा हस्तक असलेल्या इकबाल मिर्चीची पॉवर ऑफ अॅटर्नी असल्याचे ईडी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वरळीतील 'राबिया मेंशन' ही इमारत इक्बाल मिर्चीचा संबंधित कंपनीला विकण्यासाठी हुमायून मर्चंट याने महत्वाची भूमिका बजावली होती. प्रफुल पटेल हे केंद्रीय मंत्री पदावर असताना मुंबईतील वरळी येथील सीजे इमारतीच्या जमीन व्यवहार प्रकरणी प्रफुल पटेल व मर्चंट यांची भेट झाल्याचेही सांगितले जात आहे.