मुंबई - आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. हे प्रकरण न्यायालयात आहे. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान रश्मी शुक्ला यांची बाजू ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी मांडली. जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितलं की, फोन टॅप करण्याची परवानगी राज्य सरकारनेच दिली होती.
पोलीस दलातील बदल्यांमध्ये होणारे भ्रष्टाचार खरे आहेत का? हे तपासण्यासाठी ही परवानगी देण्यात आली होती, असे महेश जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितले आहे. रश्मी शुक्ला यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी झाली. न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.
हेही वाचा -झोमॅटोचा IPO मिळाला नसेल तर चिंता नको, आणखी बंपर आयपीओ येणार...