मुंबई -कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी(Koregaon Bhima Violence) पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला(IPS officer Rashmi Shukla) यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे(Koregaon Bhima Commission) साक्ष नोंदवण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांनी आयोगापुढे हजेरी लावली. मात्र, काही आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांची साक्ष नोंदवण्यात आली नाही. दरम्यान, पुढील तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिषीर हिरे यांनी दिली.
- रश्मी शुक्ला चौकशी समितीसमोर हजर -
मुंबईत दोन दिवस रश्मी शुक्ला यांची साक्ष नोंदवली जाणार होती. २०१८ मध्ये कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीनंतर राज्य सरकारने या प्रकरणी कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखालील चौकशी आयोग नेमला आहे. या आयोगाकडून सध्या शुक्ला यांची साक्ष नोंदवली जात आहे.
- काय आहे प्रकरण ?
आयपीएस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) आणि रश्मी शुक्ला(Rashmi Shukla) यांना समन्स बजावण्याचे आदेश कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने दिले होते. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केला होता. कोरेगाव भीमा हिंसाचार घडला त्यावेळी परमबीर सिंह हे ADG law and order व शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त होत्या.