महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Paramveer Singh meet CM : परमवीर सिंग यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; सिंग यांना क्लीन चीट मिळणार का ? चर्चांना उधाण - Paramveer Singh meet CM at Varsha residence

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करून खळबळ माजवणारे वादग्रस्त आयपीएस अधिकारी आणि खंडणीचा गुन्हा दाखल असणारे परमवीर सिंग यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली (Paramveer Singh meet CM) आहे

Paramveer Singh meet CM
परमवीर सिंग यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

By

Published : Oct 14, 2022, 9:56 AM IST

Updated : Oct 14, 2022, 10:11 AM IST

मुंबई :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करून खळबळ माजवणारे वादग्रस्त आयपीएस अधिकारी आणि खंडणीचा गुन्हा दाखल असणारे परमवीर सिंग यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली (Paramveer Singh meet CM) आहे. तब्बल 15 ते 20 मिनिटं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परमवीर सिंग यांच्या चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेनंतर परमवीर सिंग यांना क्लीन चीट मिळण्याबाबत चर्चांना उधाण आले (meeting at Varsha residence) आहे.

शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराचा लेटरबॉम्ब -वादग्रस्त पोलिस अधिकारी परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराचा लेटरबॉम्ब फोडला. आणि त्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या कथेत भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय आणि ईडीने अनिल देशमुख यांना अटक (Paramveer Singh meet CM at Varsha residence) केली.

क्लिनचीट मिळणार का ?आता परमवीर सिंग (IPS officer Paramveer Singh) यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने त्यांचं पुन्हा पोलीस दलात पुनरागमन होतं का, हे पाहावं लागणार आहे. याआधी पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणी अनेक आरोप झाले होते. मात्र, त्यांना आता क्लीनचीट मिळाली आहे. त्यामुळे परमवीर सिंग यांनाही क्लिनचीट मिळते का ? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. मध्यंतरी परमवीर सिंग यांच्यावरही अटकेची तलवार होती. मात्र, त्यांना न्यायालयाने दिलासा दिला होता.

कोण आहेत परमवीर सिंग -परमवीर सिंग हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

काय आहे प्रकरण -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त असताना आपल्याला अवैधरीत्या मुंबई मधील बार मालकांकडून 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले. अशा प्रकारचे खळबळजनक पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. तसेच आपण केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, यासाठी परमवीर सिंग यांनी सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिल्यानंतर, परमवीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका केली होती. या याचिकेसह अजून एक याचिका अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली असून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेले आरोप गंभीर असून या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी कोर्टाकडे केली. सोबतच या संबंधीची तक्रार मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये केली असल्याचे अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी कोर्टापुढे मांडले. त्यानंतर झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपासाठी सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच पुढील पंधरा दिवसात सीबीआयने आपला प्राथमिक चौकशी अहवाल कोर्टासमोर सादर करावा, अशा प्रकारचे निर्देशही सीबीआयला देण्यात आले आहेत. या आदेशानंतर गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

परमबीर सिंग यांच्या आरोपांची चौकशी -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी लावलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. त्यामुळे आता सीबीआयकडून या प्रकरणी अनिल देशमुखांची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, तत्पूर्वी परमवीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. यावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने परमवीर सिंग यांना हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते. तर या चौकशीविरोधात राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.

Last Updated : Oct 14, 2022, 10:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details