मुंबई -केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी वरिष्ठ आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची प्रतिनियुक्तीवर राष्ट्रीय तपास संस्थेचे एनआयएच्या अतिरिक्त महासंचालकपदी आज ( गुरुवारी ) नियुक्ती केली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी ( Senior IPS officer Atul Kulkarni ) महाराष्ट्राच्या कारागृहा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने ( Union Home Ministry ) हा आदेश जारी केला आहे. एमएचएने महाराष्ट्र सरकारला कुलकर्णी यांना तत्काळ कार्यमुक्त करा, असे आदेशात म्हटले आहे. एनआयएचे पोलीस महानिरीक्षक हे पद तात्पुरते एडीजी पदावर श्रेणीसुधारित करण्यात आले आहे. कुलकर्णी यांची नियुक्ती एका वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत करण्यात आली आहे.
AtulChandra Kulkarni : आयपीएस अतुलचंद्र कुलकर्णी यांची एनआयएच्या अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्ती - वरिष्ठ आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी
वरिष्ठ आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी ( Senior IPS officer Atul Kulkarni ) यांची एनआयएच्या अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ( As Additional Director General of NIA ) महाराष्ट्राच्या कारागृहा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी ते होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने ( Union Home Ministry ) हा आदेश जारी केला आहे. एमएचएने महाराष्ट्र सरकारला कुलकर्णी यांना तत्काळ कार्यमुक्त करा, असे आदेशात म्हटले आहे.
![AtulChandra Kulkarni : आयपीएस अतुलचंद्र कुलकर्णी यांची एनआयएच्या अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्ती AtulChandra Kulkarni](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15269460-thumbnail-3x2-w.jpg)
कोण आहेत अतुल कुलकर्णी ? :अतुल कुलकर्णी मूळचे सोलापूरचे आहे. सन 1990 च्या आयपीएस बॅचचे ते अधिकारी आहेत. पोलीस दलात नांदेड येथे सहायक अधीक्षक म्हणून रुजू झालेल्या कुलकर्णींनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक (जळगाव) आणि पोलीस अधीक्षक (भंडारा) म्हणून काम केले आहे. नागपूर येथे नक्षलविरोधी मोहिमेतही त्यांचा सहभाग होता. संयुक्त राष्ट्रांसाठी काम केल्यानंतर मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. कुलकर्णी हे 1990 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी असून ते सध्या पुण्यात एडीजी कारागृहात कार्यरत आहेत. यापूर्वी ते महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) तसेच मुंबईतील सह पोलिस आयुक्त (गुन्हे) होते.
हेही वाचा -Raj Thackeray Ayodhya Tour : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी मनसेकडून 11 रेल्वे गाड्यांची बुकिंग