मुंबई राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सागर या शासकीय बंगल्यावर भेट घेतली आहे. फोन टॅपिंग प्रकरणाची आज सुनावणी आहे. त्यापूर्वीच रश्मी शुक्ला यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आला आहे.
सुनावणीपूर्वी गृहमंत्री भेट राज्य विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीमध्ये आणि सत्ता स्थापनेच्या काळात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी विरोधकांचे फोन टॅप केले होते. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांची चौकशी लावली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत फोन टॅपिंगचा आरोप केला होता. चौकशी सुरू होताच रश्मी शुक्ला यांनी केंद्रात बदली करून घेतली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. न्यायालयात यावर आज सुनावणी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.
पुन्हा महाराष्ट्र रश्मी शुक्ला सध्या हैदराबादमध्ये कार्यरत आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भासाठी भ्रष्टाचार होतो. असा अहवाल शुक्ला यांनी तयार केला होता. त्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत आल्या. आता राज्यात शिंदे यांच्या मदतीने भाजप सत्तेवर आले आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले आहेत. त्यामुळे रेशमी शुक्ला पुन्हा महाराष्ट्रात येणार का ? याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
मोहित कंबोजही फडणवीस भेटीला राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. सिंचन घोटाळ्यावरून त्यांनी सलग ट्विट केले आहेत. लवकरच राष्ट्रवादीचा बडा नेता आत जाईल, असा दावा करत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे अंगुलीनिर्देश केले. अधिवेशन काळात विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून कंबोज यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राज्यातील घडामोडी वाढत असताना संध्याकाळी मोहित कंबोजानी रश्मी शुक्ला यांच्या सहित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तिघांनी तब्बल 10 मिनिटे चर्चा केली आहेतद. या चर्चेत नेमकं काय घडले याची उत्कंठा वाढली आहे.
हेही वाचा -Thane Dahi Handi 2022 ठाण्यातील दहीहंडी उत्सवाची जंगी तयारी, लाखोंची बक्षिसे जाहीर करण्यात राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा