मुंबई -पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार प्रशिक्षणासाठी दिल्लीला जाणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या दिल्ली येथील निवासस्थानी स्नेह भोजनासाठी ( Sharad pawar Delhi residence dinner MLA ) आमंत्रित केले आहे. उद्या सायंकाळी हा डिनर डिप्लोमेसीचा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमादरम्यान सर्व आमदारांना शरद पवार काय कानमंत्र देणार याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा -मुंबई बँक फसवणूक प्रकरणी प्रवीण दरेकरांची आज मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी
दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी सर्व पक्ष आमदार हे दिल्लीला असून, 5 आणि 6 एप्रिलला हे प्रशिक्षण होणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व आमदार दिल्लीत असल्यामुळे शरद पवार यांनी या सर्व आमदारांना आपल्या घरी स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये संवादाचा अभाव दिसत आहे. निधीअभावी शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांची नाराजी आहे. त्यामुळे, या स्नेहभोजनादरम्यान शरद पवार आमदारांना कोणता कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे.
युपीएचे नेतृत्व करण्यात रस नाही : काँग्रेस शिवाय भाजपा विरोधात देशात सक्षम आघाडी करणे शक्य नाही. काँग्रेस हा देशातील प्रत्येक राज्यात पसरलेला पक्ष आहे. मान्य आहे अनेक ठिकाणी त्यांची सत्ता नाही. मात्र, त्यांना सोबत घेऊनच एक सक्षम पर्याय बनवला गेला पाहिजे. शिवाय मी सुद्धा यूपीएचे नेतृत्व करावे असे बोलले जाते. पण मला त्यामध्ये अजिबात रस नाही. मात्र, भाजपा विरोधातील निर्माण होणाऱ्या आघाडीला माझा पूर्ण पाठींबा असेल. त्यांना लागणारी सर्व मदत करायला पण तयार आहे, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा -MNS-BJP Alliance ? : सध्या युतीची चर्चा नाही! मात्र यांना का मिर्चा झोंबतात; मनसे नेत्याचे ट्विट