महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MH Assembly Winter Session 2021 : वांद्रे येथील बेपत्ता मुलीचा तपास क्राईम ब्रांचकडे - सतेज पाटील - मनिषा कायंदे वांद्रे बेपत्ता मुली प्रकरण

वांद्रे येथे वैद्यकीय परिक्षेला गेलेल्या बेपत्ता मुलीच्या ( Bandra Girl Kidnaping ) तपासाचे आज विधानपरिषदेत तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेने ( Shivsena On Bandra Girl Kidnaping ) बेपत्ता मुलीचा मुद्दा उपस्थित करत, तीच्या शोधासाठी तत्काळ पथक नेमावे, अशी मागणी केली. दरम्यान, बेपत्ता मुलीच्या तपासाची जबाबदारी क्राईंम ब्रॅंचकडे सोपवल्याचे माहिती, राज्यमंत्री सतेज पाटील ( Satej Patil Statement On Bandra Girl Kidnaping Case ) यांनी दिली.

Satej Patil in Assembly Winter Session
Satej Patil in Assembly Winter Session

By

Published : Dec 23, 2021, 6:01 PM IST

मुंबई -वांद्रे येथे वैद्यकीय परिक्षेला गेलेल्या बेपत्ता मुलीच्या ( Bandra Girl Kidnaping ) तपासाचे आज विधानपरिषदेत तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेने ( Shivsena On Bandra Girl Kidnaping ) बेपत्ता मुलीचा मुद्दा उपस्थित करत, तीच्या शोधासाठी तत्काळ पथक नेमावे, अशी मागणी लक्षवेधी सूचना मांडताना लावून धरली. दरम्यान, बेपत्ता मुलीच्या तपासाची जबाबदारी क्राईंम ब्रॅंचकडे सोपवल्याचे माहिती, राज्यमंत्री सतेज पाटील ( Satej Patil Statement On Bandra Girl Kidnaping Case ) यांनी दिली.

'मागील ३ वर्षांत एकूण ३ हजार ५१९ मुली गायब झाल्या' -

मुंबईतून प्रतिवर्षी शेकडो मुली गायब होतात. वर्ष २०१९ मध्ये १ हजार ४८२, वर्ष २०२० मध्ये ८७९, तर वर्ष २०२१ मध्ये १ हजार १५८ मुली अशा मागील ३ वर्षांत एकूण ३ हजार ५१९ मुली गायब झाल्या आहेत. हिवाळी अधिवेशनात शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना विधान परिषदेत मांडली. २९ नोव्हेंबर २०२१ ला पालघर जिल्ह्यातील बोईसर मधील ‘एमबीबीएस’ ची विद्यार्थीनी गायब झाली. वीस दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी, तिचा थांगपत्ता लागत नाही. वांद्रे पोलिसांसाठी देखील हे प्रकरण आव्हानात्मक बनले आहे. आमदार डॉ कायंदे यांनी यावरुन सकाळच्या सत्रात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुंबईत किती सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत, अशी मागणी करताना, बेपत्ता तरुणी स्वदिच्छा माने हिचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवावा, अशी मागणी केली. महिलांबाबत सोशल मीडियावरुन आक्षेपार्ह विधाने केली जातात. दिवसेंदिवस असे प्रकार वाढू लागले असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.

तपास क्राईम ब्रांचकडे -

गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी यावर उत्तर दिले. ते म्हणाले की, सदिच्छा माने हिचा शोध घेण्यासाठी कार्यरत सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरु आहे. मुंबई पोलीस योग्य कारवाई करत आहेत. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी, याबाबत तपास क्राईम ब्रांचकडे सोपवावा, अशी सूचना केली. त्यानंतर क्राईम ब्रँचकडे या प्रकरणाचा तपास सोपवला जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईत सध्या पाच हजार सीसीटीव्ही कार्यरत आहेत. ही संख्या आता सात हजारपर्यंत वाढवली जाईल. शासन व सोशल मीडिया चालविणाऱ्या कंपन्या एकत्रित काम करत आहेत. महिलांच्या सुरक्षेला नेहमी प्राधान्य दिल्याचे मंत्री पाटील म्हणाले.

९७ टक्के मुलींचा शोध-

मुंबईत गायब होणाऱ्या मुलींच्या तपासासाठी शासनाच्या ‘मुस्कान’ मोहिमे सुरु आहे. राज्यभरात याच मोहिमेतून गायब झालेल्या मुलींचा शोध घेतला जातो. महाविद्यालये आणि घरगुती कारणांमुळेही मुली गायब होतात. परंतु, आतापर्यंत ९७ टक्के मुलींचा शोध घेतल्याची माहिती राज्यमंत्री पाटील यांनी दिली.

हेही वाचा -Shakti Act passed - शक्ती कायदा विधानसभेत एकमताने मंजूर; या कायद्याने काय होणार? वाचा..

ABOUT THE AUTHOR

...view details