महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anil Deshmukh Case : सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांची चांदीवाल आयोगासमोर तपासणी - अनिल देशमुख 100 कोटी वसूली प्रकरण

चांदीवाल आयोगासमोर आज (मंगळवार) अनिल देशमुख ( Anil Deshmukh Case ) यांच्या वकिलांकडून सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील ( Assistant Police Commissioner Sanjay Patil ) यांची उलट तपासणी करण्यात आली आहे.

अनिल देशमुख
अनिल देशमुख

By

Published : Jan 4, 2022, 6:27 PM IST

मुंबई -100 कोटी कथित वसुली ( 100 Crore Extortion Case ) प्रकरणाचा आरोप लावल्यानंतर राज्य सरकारकडून चौकशी करण्याकरीता चांदीवाल आयोग ( Chandiwal Commission ) गठीत करण्यात आले होते. या आयोगासमोर आज (मंगळवार) अनिल देशमुख ( Anil Deshmukh Case ) यांच्या वकिलांकडून सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील ( Assistant Police Commissioner Sanjay Patil ) यांची उलट तपासणी करण्यात आली आहे. उद्या (बुधवारी) पुन्हा आयोगासमोर संजय पाटील यांची सचिन वाझे ( Sachin Waze ) यांचे वकील उलट तपासणी करणार आहे.



काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसूलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याच प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

हेही वाचा -नवाब मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा; प्रतिज्ञापत्र सादर करण्याकरिता ज्ञानदेव वानखेडेंनी मागितला दोन आठवड्यांचा वेळ

ABOUT THE AUTHOR

...view details