मुंबई -सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआय, एनसीबी आणि ईडी या तीनही तपास यंत्रणा काम करत आहेत. सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन उघड झाले आहे. त्यात बॉलिवूडमधूल अनेकांची नावे समोर आली आहेत. पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा बायोपिक तयार करणाऱ्या संदीप सिंग याचे नाव देखील समोर आले आहे. मग त्याची चौकशी का केली जात नाही ? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. तसेच त्याची चौकशी करण्यात यावी, या मागणीकरिता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आहे.
ड्रग्ज कनेक्शन : मोदींचा बायोपिक तयार करणाऱ्या संदीप सिंगची चौकशी करा, काँग्रेसची मागणी - Sushant Singh death case
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन उघड झाले आहे. त्यात बॉलिवूडमधून अनेकांची नावे समोर आली आहेत. पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा बायपिक तयार करणाऱ्या संदीप सिंग याचे नाव देखील समोर आले आहे. मग त्याची चौकशी का केली जात नाही ? असा सवाल काँग्रेसने केला आहे. तसेच त्याची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट बनवणारा अभिनेता आणि सहनिर्माता विवेक ओबेरॉय यांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आहे का? या जीवनपटाचा निर्माता संदीप सिंग याने भाजपाच्या नेत्यांना ५६ फोन का केले? या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. त्याबाबत सावंत यांनी ३१ ऑगस्ट रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र दिले होते. गृहमंत्र्यांनी हे पत्र एनसीबीला दिले आहे. मात्र त्यानंतरही अद्याप तपास केला जात नसल्याने पुन्हा सचिन सावंत यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली.
पतंप्रधान मोदी यांच्यावर बायोपिक बनवणारा अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरावर कालच बंगळुरू पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यादरम्यान त्याचा मेव्हणा आदित्य अल्वा याचा शोध घेतला गेला. अल्वा याचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आहे. यामुळे त्याला शोधण्यासाठी बंगळुरू पोलीस मुंबईत आले आहेत. तसेच मोदींवरील बायोपिकचा निर्माता संदीप सिंग याने भाजपा नेत्यांना ५६ कॉल केले आहेत. ते कॉल त्याने का केले, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली आहे.