महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खासदार संभाजी व खासदार उदयनराजे भोसले यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करा - अ‌ॅड. सदावर्ते - Sambhaji raje Investigation demand

मराठा आरक्षणाला नक्षलवादी संघटनांनी सहानभूती दाखवल्याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांनी नक्षलवादी संघटनांचे आभार मानले. त्यामुळे, संभाजी राजे छत्रपती यांचे वक्तव्य म्हणजे नक्षलवादी संघटनांची सहानभूती आणि आदर बाळगणे आहे. हे देशद्रोही कृत्य असल्याचे अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हंटले.

Sambhaji raje Traitor act accuse adv sadavarte
संभाजी राजे तपास यंत्रणा चौकशी मागणी अॅड सदावर्ते

By

Published : Jun 14, 2021, 8:55 PM IST

Updated : Jun 14, 2021, 9:19 PM IST

मुंबई - मराठा आरक्षणाला नक्षलवादी संघटनांनी सहानभूती दाखवल्याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांनी नक्षलवादी संघटनांचे आभार मानले. त्यामुळे, संभाजी राजे छत्रपती यांचे वक्तव्य म्हणजे नक्षलवादी संघटनांची सहानभूती आणि आदर बाळगणे आहे. हे देशद्रोही कृत्य असल्याचे अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हंटले.

माहिती देताना अ‌‌ॅड. गुणरत्न सदावर्ते

हेही वाचा -Mumbai Corona : धारावीकरांनी सातव्यांदा करून दाखवलं, महापौरांनी मानले आभार

सध्याच्या कोरोना काळामध्ये महाराष्ट्राला त्रास देण्यासाठी राज्यातील दोन खासदार निघाले. त्यापैकी एक म्हणजे खासदार संभाजी व दुसरे उदयनराजे भोसले. हे दोन्ही खासदार सध्या त्यांच्या वक्तव्यातून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत असतात. संभाजीराजे छत्रपती यांनी नक्षलवादी संघटनांनी मराठा आरक्षणाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले, तर कोर्ट, कचेरीवर आपला विश्वास नसल्याचे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले आहे. उदयनराजे भोसले यांना खासदारकी पदावर राहण्याचा अधिकार नसून या दोघांचीही वक्तव्ये असैविधानिक असून प्रतिबंधित संघटनांसोबत यांची कुठली लिंक आहे, हे केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे तपासणे गरजेचे असल्याचे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

16 जून रोजी मराठा आरक्षणाला घेऊन जे आंदोलन केले जाणार आहे, ते कोरोना संक्रमण काळामध्ये केले जाऊ नये, यास परवानगी देऊ नये, अशी मागणी अ‌‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेतेमंडळींनी लक्ष दिले नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याचे सदावर्ते म्हणाले.

हेही वाचा -राज्यातील परिचारिकांची 21 जूनपासून आंदोलनाची हाक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

Last Updated : Jun 14, 2021, 9:19 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details