महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मानखुर्द जकात नाक्यावरून धावणार आंतरराज्यीय बस, पालिका खर्च करणार २४० कोटी रुपये - Mumbai Municipal Corporation

जकात कर रद्द झाल्यानंतर जीएसटी कर प्रणाली सुरू करण्यात आली. त्यामुळे रिक्त झालेल्या जकात नाक्यांचा जागांचा वापर करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मुंबईतील जकात नाक्यांच्या जागेवर परिवहन आणि व्यावसायिक केंद्र विकसित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मानखुर्द जकात नाक्याच्या जागेवर परिवहन आणि व्यावसायिक केंद्र विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात या केंद्रातून आंतरराज्यीय बस सेवा सुरू करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल २४० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

महापालिका
महापालिका

By

Published : Mar 13, 2022, 9:08 PM IST

मुंबई- जकात कर रद्द झाल्यानंतर जीएसटी कर प्रणाली सुरू करण्यात आली. त्यामुळे रिक्त झालेल्या जकात नाक्यांचा जागांचा वापर करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मुंबईतील जकात नाक्यांच्या जागेवर परिवहन आणि व्यावसायिक केंद्र विकसित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मानखुर्द जकात नाक्याच्या जागेवर परिवहन आणि व्यावसायिक केंद्र विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात या केंद्रातून आंतरराज्यीय बस सेवा सुरू करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल २४० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

परिवहन व व्यावसायिक केंद्र -मुंबई शहरात प्रवेश करण्यासाठी मानखुर्द, ऐरोली, मुलुंड एलबीएस मार्ग, मुलुंड पूर्व द्रुतगती मार्ग व दहिसर हे पाच जकात नाके होते. २०१७ साली जकात कर रद्द होऊन जीएसटी प्रणाली लागू झाल्याने या जकात नाक्यांच्या रिक्त झाल्या. पाचही जकात नाके मुंबई पालिकेच्या अखत्यारित येतात. यातील मानखुर्द जकात नाक्याच्या जागेचे क्षेत्रफळ सुमारे २९ हजार चौरस मीटर इतके आहे. या जागेवर पालिकेकडून परिवहन व व्यावसायिक केंद्र उभारले जाणार आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या आणि परिवहन सुविधांची गरज लक्षात घेऊन आंतरराज्यीय बस सुविधा केंद्र उभारणे, त्याचा शहरातील अन्य वाहतूक व्यवस्थेसोबत समन्वय तसेच शहरातील नागरिकांकरिता व्यावसायिक व मनोरंजनाच्या सुविधा पुरवणे हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. या प्रकल्पातून पालिकेलाही मोठे उत्पन्न मिळणार असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.

सल्लागारासाठी पाच कोटी रुपये -परिवहन व व्यावसायिक केंद्रातून आंतरराज्य बस सेवा सुरू करण्यात येणार असल्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या व्यावसायिक जागा, किरकोळ वस्तू विक्रीसाठी गाळे, मनोरंजनाच्या जागा, आरोग्य सुविधा केंद्र, सीएनजी व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आदी सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. या कामाचा कार्यादेश दिल्यापासून सुमारे ३६ महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. तशी अट कंत्राटदाराला घालण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. कामाचा विकास योजना आराखडा तयार करून त्याला विविध सरकारी यंत्रणांची मान्यता प्राप्त करून घेणे, निविदा प्रक्रिया राबवणे ही कामे सल्लागारामार्फत करण्यात येणार आहेत. यापोटी सल्लागाराला पाच कोटी ३० लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे.

हेही वाचा -Aditya on Health Workar : आरोग्य कर्मचारी हे पृथ्वीवरचे खरे देव - आदित्य ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details