- मुंबई -कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन (Omicron Variant) या नवीन व्हेरियंटच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना चाचण्या (Corona Test) केल्या जात आहेत. आतापर्यंत मुंबईत 4845 परदेशी प्रवासी (International Travellers) आले असून त्यापैकी 23 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्व प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या सहवासातील लोकांचा शोध घेतला जात आहे.
- 23 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह -
कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार सुरू झाल्याने मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. 10 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान हाय रिस्क देशातून 4845 प्रवासी मुंबईमध्ये आले आहेत. या सर्वांचा शोध घेण्याचे व चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 23 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात 19 पुरुष तर 4 महिला प्रवासी आहे. या पॉझिटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. या सर्व पॉझिटिव्ह प्रवासी रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंग तसेच एस जिन चाचणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.
- परदेशी प्रवाशांच्या चाचण्या -