मुंबई -मराठा समाजाच्या मागण्यांकरिता शनिवारपासून आजाद मैदान येथे छत्रपती संभाजीराजे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून, संभाजी राजे यांची प्रकृती अस्थिर झाल्यामुळे जेजे रुग्णालयातील डॉक्टरांना उपोषणस्थळी बोलवण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी सुचवलेल्या उपचाराला संभाजीराजे यांनी नकार दिला आहे.
माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी आणि मराठा समाज समन्वय सदस्य हेही वाचा -Fir Against Narayan rane : दिशा सालियनची बदनामी भोवली, राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या मागण्यांकरिता छत्रपती संभाजीराजे यांचे सुरू असलेल्या आमरण उपोषणावर राज्य सरकारने लवकरात लवकर लक्ष घालून ते मिटवण्याची मागणी मराठा समाज समन्वय समितीच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे. संभाजी राजे यांना उपोषादरम्यान जर काही झाले तर त्याची सर्व जबाबदारी राज्य सरकारची असेल. राज्य सरकारने लवकरात लवकर लक्ष घालून ते मिटवावे, अन्यथा उद्यापासून संपूर्ण राज्यामध्ये मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येणार आहे आणि ते तीव्रतेने करण्यात येणार आणि त्यास राज्य सरकार जबाबदार असणार, असे समन्वयक समिती सदस्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -Sanjay Raut on raids : केंद्रिय एजन्सींना केवळ महाराष्ट्रातच काम आहे - संजय राऊत