मुंबई- मुंबई परिसरात अनधिकृत मटन विक्रेतावर कारवाई ( BMC action against unauthorized meat seller ) करण्याकरिता गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्याला विक्रेत्याकडून करण्यात आलेले शिवीगाळ व धमकी ( meat seller threatening to BMC employee ) नंतर संबंधित पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला निकाली काढत मुंबई सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. त्यानुसार एखादा व्यक्तीला शिविगाळ करणे किंवा धमकी देणे म्हणजे जीवघेणा हल्ला ( Fatal attack of mutton seller on BMC Employee ) नव्हे असे म्हटले आहे. हे प्रकरण 15 वर्ष जुन्या प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालयाने निकाल ( Mumbai Session Court decision ) देत विक्रेत्याला दिलासा दिला आहे.
मटन विक्रेत्याची निर्दोष मुक्तता - तब्बल 15 वर्ष जुन्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. मुंबई सत्र न्यायालयात बेकायदेशीर दुकानावर कारवाई करताना बीएमसी अधिकाऱ्यांना शिविगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणा दाद मागण्यात आलेली होती. यावेळी बीएमसीकडून तबरेझ कुरेशी या 42 वर्षांच्या दुकानदावर पालिकेकडून आरोप करण्यात आलेले होते. या आरोपांचे खंडण करत न्यायालयाने तबरेझ यांना निर्दोष मुक्त केले आहे. मुंबई सत्र न्यायालयात सुरु असलेल्या या प्रकरणी आरोपी तबरेझची ओळख पटवण्यातही असमर्थता दर्शवण्यात उशीर केला होता. तसेच कुणीही आपल्या साक्षीमध्ये तबरेझ यांने पालिका अधिकाऱ्यांवर हल्ला केला, असा ठोस पुरावा न्यायालयाला आढळून आलेला नव्हता.
न्यायालयाचे निरीक्षण - भीती निर्माण करण्यासाठी किंवा चीड आणण्यासाठी केली गेलेली शिवीगाळ असेल किंवा धमकी देण्यात आलेली असेल तर त्याचा अर्थ हल्ला झाला असे मानता येणार नाही असे मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केले. एका व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कारवाई करावी असा खटला दाखल करण्यात आला होता. बेकायदेशीर मटण दुकानावर बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली होती.