मुंबई :शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ( After The Revolt of Eknath Shinde ) शिवसेनेतील 40 आमदार शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट ( Vertical split in Shiv Sena ) पडली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठी उलथापालथ चालू झाली. त्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यात सरकार अल्पमतात आल्याचे तसेच बहुमत सिद्ध करण्याचे विनंती पत्र माननीय राज्यपालांना दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी आज बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्टकरण्याकरिता सर्व पक्षांना बोलावले होते. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे विधान सभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी केलेली बातचीत.......
राज्यपालांनी केला विधिमंडळ व विधान सभेचा अपमान : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विश्वास मत चाचणी घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. मात्र, त्याचसोबत विश्वास मत चाचणी घेताना ती आवाजी मतदान पद्धतीने घ्यावी आणि त्याचे चित्रीकरण करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. वास्तविक राज्यपालांना विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करता येत नाही. विधिमंडळाच्या कामकाजाचे काही नियम ठरलेले असतात नियमावली ठरलेली असते विधिमंडळाच्या अध्यक्षाला ते सर्व अधिकार आहेत आणि त्याचप्रमाणे कामकाज होते, असे मत माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. राज्यपालांनी विधानसभेच्या कामकाजाबाबतही पत्रात निर्देश देऊन विधानसभेचा आणि विधिमंडळाचा अपमान केला आहे, अशा पद्धतीने हस्तक्षेप करणे योग्य नसल्याचे मत पटोले यांनी व्यक्त केले आहे