मुंबई - तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. (Mamata Banerjee in Mumbai) केंद्रात मोदीविरोधी मोट बांधण्यासाठी त्यांनी मुंबईत महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, या दौऱ्यादरम्यान मुंबईतील वायबी सेंटर येथे सामाजिक सांस्कृतिक तसेच पत्रकार यांच्याशी संवाद साधताना त्यांना राष्ट्रगीताचा (National Anthem) सन्मान राखण्याचा विसर पडल्याचा आरोप होत आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली. पण त्या राष्ट्रगीत अर्धवटच बोलल्या. इतकेच नाही तर ते माध्यमांसमोर राष्ट्रगीत खाली बसून गायल्या. त्यामुळे ममता दीदींकडून राष्ट्रगीतचा अवमान झाला, असा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय.
नेमकं काय झालं होत
मुंबईतील वायबी सेंटर येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी दुपारी ममता बॅनर्जींचा वार्तालाप होता. या वार्तालापा नंतर ममता बॅनर्जी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार (Mamata Pawar Meet) यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जाणार होत्या. ३ वाजता ही भेट नियोजित होती. परंतु, या वार्तालापास त्यांना उशीर झाल्या कारणाने ममता बॅनर्जी घाईत आहेत हे त्यांच्या हालचालीवरून स्पष्ट दिसत होत. अशातच कार्यक्रम संपल्यावर राष्ट्रगीत सुरू झाल तेव्हा ममता बॅनर्जी यांनी बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली त्यावेळी त्या खाली बसलेल्या होत्या. त्यानंतर त्या बोलता बोलता जागेवरुन उठल्या. यावेळी त्या राष्ट्रगीच्या उर्वरित ओळी बोलू लागल्या. त्यानंतर त्यांनी 'जय महाराष्ट्र, जय बंगाल, जय भारत', अशी घोषणा केली. ममता बॅनर्जींच्या या वागण्यावर सध्या विरोधकांकडून टीका होत आहे.
ममता बॅनर्जी वर गुन्हा दाखल करावा