मुंबई शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर एका बाजूला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली होत असतानाच, दुसरीकडे या सर्व घडामोडींकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक संधी म्हणून पाहताना दिसते. याच पार्श्वभूमीवर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले असून त्यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची अतिशय महत्त्वाची बैठक आज मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बोलवली आहे. या बैठकीत राज ठाकरेंनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची तयारी करण्याचे आदेश सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच सध्या ज्या काही गोष्टी पेरल्या जात आहेत. त्या तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका. या भावनिक राजकारणाला बळी पडू नका, असे सूचना देखील राज ठाकरे MNS President Raj Thackeray यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
स्वबळाची तयारी कराया बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले की, येणारी निवडणुक स्वबळावर लढायची आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये निवडणुका लागतील. आपल्याकडे आता ५ महीने आहेत. त्यासाठी तुमचं पाॅझीटीव्ह माईंड असलं पाहीजे. राज्यातील राजकारण खालच्या थराला जातंय. जे पेरलं जातंय, ते तुमच्या डोक्यात जाता कामा नये. असं म्हणत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता कार्यकर्ते आपापल्या भागात स्वबळाची तयारी करत आहेत.