मुंबई - आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या ( INS Vikrant Fraud Case ) बचावासाठी गोळा केलेल्या निधीबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून भाजपचे नेते किरीट सोमैयांची तीन तास चौकशी करण्यात आली. पुढील तीन दिवस याच प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी पार पडल्यानंतर त्यांनी काहीच शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ( Kirit Somaiya Appears Before Mumbai Police ) आहे.
आयएनएस विक्रांतच्या घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमैयांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोमैयांनी न्यायालयात अटकपूर्ण जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने त्यांना दिलासा देत चौकशीला जाण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे किरीट सोमैया ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.