महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

INS Vikrant cheating case : निल सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश - आयएनएस विक्रांत घोटाळा निल सोमय्यांना दिलासा

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या यांना देखील मुंबई उच्च न्यायालयाने आयएनएस विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी दिलासा (Bombay High Court protection Neil Somaiya) दिला आहे. निल सोमय्या यांच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही कठोर कारवाई करू नये असे आदेश उच्च न्यायालयाने (Bombay High Court on Neil Somaiya) दिले आहेत. तसेच पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करण्याचे आदेश निल सोमय्या यांना उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

Neil Somaiya
निल सोमय्या

By

Published : Apr 20, 2022, 3:01 PM IST

मुंबई -भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या यांना देखील मुंबई उच्च न्यायालयाने आयएनएस विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी दिलासा (Bombay High Court protection Neil Somaiya) दिला आहे. निल सोमय्या यांच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही कठोर कारवाई करू नये असे आदेश उच्च न्यायालयाने (Bombay High Court on Neil Somaiya) दिले आहेत. तसेच पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करण्याचे आदेश निल सोमय्या यांना उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. आयएनएस विक्रांत (INS Vikrant Cheating Case) युद्धनौकेला भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी "सेव्ह विक्रांत" मोहिमेअंतर्गत जनतेकडून निधी गोळा केला होता. हा निधी 58 कोटी रुपये एवढा असून, यात अपहार झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on INS Vikrant Cheating Case) यांनी केला. याबाबतची तक्रार त्यांच्याकडून करण्यात आली होती.

सोमय्या पिता-पुत्रांना दिलासा -आयएनएस विक्रांत कथित घोटाळा प्रकरणात या आधीच मुंबई उच्च न्यायालयाने भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना दिलासा दिला होता. मात्र, त्यांनाही पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेकडून किरीट सोमय्या यांची चौकशी सुरू आहे. गुरुवारपर्यंत त्यांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जाणार आहे. तिथेच निल सोमय्या यांना देखील पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनाही चौकशीसाठी आता हजर राहावे लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details