मुंबई - सर्वोच्च न्यायालयाकडून पदोन्नती आरक्षणाला नकार मिळाल्यानंतर ही राज्यातील दोन मंत्री नितीन राऊत व अजित पवार यांच्याकडून पदोन्नती आरक्षण देऊ असे वक्तव्य केले जात आहे. जनतेसमोर हे नेते आरक्षणाबद्दल वेगळी भाषा करत असतात. मात्र, कोर्टात गेल्यानंतर आम्ही आरक्षण देऊ शकत नाही असे प्रतिज्ञापत्र सादर करत आहेत. यामुळे जनतेची दिशाभूल करून खोटे बोलत असल्याचा आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणाऱ्या या दोन्ही नेत्यांची चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नितीन राऊत, अजित पवार यांची चौकशी करा -अॅड गुणरत्न सदावर्ते
अजित पवार आणि नितीन राऊत आरक्षणाबद्दल वेगळी भाषा करतात. मात्र, कोर्टात गेल्यानंतर आम्ही आरक्षण देऊ शकत नाही, असे प्रतिज्ञापत्र सादर करत आहेत. यामुळे हे नेते जनतेची दिशाभूल करून खोटे बोलत असल्याचा आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
अजित पवार, नितीन राऊत
दोन्ही मंत्र्यांविरोधात चौकशीची मागणी -
राज्यातील एससी, एसटी, ओबीसी समाजासमोर या दोन्ही मंत्र्यांचा खोटारडेपणा दिसत असून, मंत्रीपदाची शपथ घेताना त्यांना अशा प्रकारचे वक्तव्य करणे अभिप्रेत नव्हते. असं गुणरत्न सदावर्ते म्हणत आहेत. आरक्षणाबद्दल खोटे बोलणाऱ्या नितीन राऊत व अजित पवार या दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात चौकशी केली जावी, अशा प्रकारची मागणी आम्ही राज्यपालांकडे केली असल्याचेही सदावर्ते म्हणाले आहेत.