मुंबई - विधानसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे, प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचत आहे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अमित शाह, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवैसी या सारखी महाराष्ट्र आणि देशातील मातब्बर नेतेमंडळी रणधुमाळीत उतरली आहे. ठिकठिकाणी सभा, दौरे, जनसंपर्क अभियान, वेगवेगळे कार्यक्रम जवळपास दररोज आयोजित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नेत्यांचा आजचा (शनिवार, 12 ऑक्टोबर) राजकीय दिनक्रम.
- देवेंद्र फडणवीस -
वर्धा
जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) येथे दुपारी 4 वाजता दादाराव केचे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.
नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये संध्याकाळी 7 वाजता प्रचार दौऱ्यावर असणार आहे.
वाशिम
वाशिममधील मार्केट यार्डमध्ये लखन मलिक यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची साडे अकरा वाजता सभा होणार आहे.
अमरावती
जिल्ह्यातील दर्यापूर येथे शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या जाहीर सभा होणार आहे.
अकोला
अकोट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी 12 वाजता जाहीर सभा
- नितीन गडकरी -
वर्धा
शहरातील सर्कस मैदान येथे भाजपचे पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची साडेचार वाजता जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर हिंगणघाट येथे दुपारी 3 वाजता भाजप उमेदवार समीर कुणावार यांच्या प्रचारार्थ सभा होईल.
लातूर
जिल्ह्यातील देवणी येथे सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा होणार आहे.
- उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे -
मुंबई
मातोश्रीवर शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार शिवसेनेचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे.
- शरद पवार-