महाराष्ट्र

maharashtra

ऑस्ट्रेलियन सरकार भारतात पेन्शन फंड आणणार - सुभाष देसाई

By

Published : Apr 7, 2022, 8:57 PM IST

आगामी काळात ऑस्ट्रेलिन सरकार भारतामध्ये पेन्शन फंड (निवृत्ती निधी) आणण्याच्या तयारी असल्याचे उच्चायुक्त बेरी ओ फॅरेल यांनी स्पष्ट केल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. महाराष्ट्र व ऑस्ट्रेलियामध्ये अनेक वर्षांचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. आगामी काळात हे संबंध अधिक वृद्धींगत करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

उद्योग मंत्री आणि वाणिज्यदूत
उद्योग मंत्री आणि वाणिज्यदूत

मुंबई - भारतीतील ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त, वाणिज्यदूत आदींनी आज (गुरुवारी) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची निवासस्थानी भेट घेतली. आगामी काळात ऑस्ट्रेलिन सरकार भारतामध्ये पेन्शन फंड (निवृत्ती निधी) आणण्याच्या तयारी असल्याचे उच्चायुक्त बेरी ओ फॅरेल यांनी स्पष्ट केल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. महाराष्ट्र व ऑस्ट्रेलियामध्ये अनेक वर्षांचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. आगामी काळात हे संबंध अधिक वृद्धींगत करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. याशिवाय खनिकर्म, डेटा सेंटर्स, इलेक्ट्रिकल व्हेइकल, अन्न प्रक्रिया, भारतीय मसाल्याची निर्यात आदींवर चर्चा झाली.

भारताने शिक्षणविषयी नवीन धोरण आणले असून आगामी काळात ऑस्ट्रेलियातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यांना आवश्यक सुविधा व सोयी पुरविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळामध्ये ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बेरी ओ फॅरेल, ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्यदूत पीटर ट्रसवेल, आर्थिक सल्लागार ह्यू बॉयलन, जोयल अॅडसेट, तसनिम वाहनवटी यांचा समावेश होता. यावेळी उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी रंगा नाईक आदी उपस्थित होते.

हेही वाचा -MP Imtiaz Jalil Warned : तुम्ही किराणा दुकानात वाईन ठेवा, आम्ही ती दुकान फोडू - खासदार इम्तियाज जलील

ABOUT THE AUTHOR

...view details