मुंबई - इंद्राणी मुखर्जी यांनी सीबीआयला पत्र दिले आहे. त्यामध्ये त्यांनी शीना बोरा कश्मीरमध्ये जिवंत असल्याचा दावा केला आहे. शीना बोरा जिवंत असून तिला एका महिलेनं कश्मीरमध्ये पाहिलंय असा (Sheena Bora alive in Kashmir) दावाही त्यांनी केला आहे. (Sheena Bora Murder Letter To CBI 2021) शीना बोराची आई आणि हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी यांनी हे सीबीआयला पत्र दिले आहे. शीना बोरा हत्याकांड (2012)मध्ये घडलं होते.
काय आहे प्रकरण ?
पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी (Peter Mukherjee and Indrani Mukherjee) यांनी साथीदारांसह एप्रिल २०१२ मध्ये मुलगी शीना बोराची (वय २४) अत्यंत क्रुरपणे हत्या केली होती. शीनाचा मृतदेहाची रायगड येथील जंगलात विल्हेवाट लावण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास करत इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्ना, चालक रायला यांनाही अटक केली होती. (Indrani Mukherjee letter To CBI 2021) शीनाच्या हत्येवेळी पीटर मुखर्जी हा परदेशात होता. मात्र, तेथूनही तो इंद्राणीच्या संपर्कात होता. पीटर आणि आणि इंद्राणी यांच्यामध्ये जवळपास २० ते २५ संभाषण झाले होते. दरम्यान, पीटर मुखर्जी व इंद्राणी मुखर्जी या दोघात घटस्फोट झाला असून या दोघांनी सहमतीने घटस्फोट घेत संपत्ती वाटून घेतली आहे.
पुन्हा एकदा या प्रकरणात खळबळ उडाली
देशभरात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणात एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. मात्र, हा खुलासा या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जीनं केला आहे. आरोपी इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात इंद्राणी मुखर्जीने केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणात खळबळ उडाली आहे. शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीने या पत्रात केला आहे. इतकंच नाही तर शीनाला काश्मीरमध्ये एका महिलेने पाहिल्याचंही तिने म्हटले आहे.
सीबीआयने ही मांडली बाजू
शामवर रायचा कबुलीजबाब आणि सरकारी पक्षांच्या साक्षीदारांच्या साक्षींची तपासणी व त्यांची विश्वासार्हता ही खटल्याच्या सुनावणीतच तपासली जाऊ शकते. या खटल्यात न्यायालयाने आरोपींविरोधात आरोप निश्चित केले असून, सुनावणी सुरू आहे. आरोपी इंद्राणीने यापूर्वी चारवेळा केलेले अर्ज न्यायालयांनी फेटाळून लावले आहेत. पुन्हा तशाच मुद्द्यांवर केलेला हा पाचवा अर्ज आहे असा युक्तिवाद सीबीआयतर्फे अॅड. संदेश पाटील यांनी केला आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळत असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. 50 वर्षीय इंद्राणी मुखर्जी गेली 6 वर्ष तुरूंगात आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात 253 पैकी केवळ 68 साक्षीदार आजवर तपासून झाले आहेत. त्यामुळे हा खटला लवकर संपण्याची काहीही चिन्ह नाहीत. अशा परिस्थितीत आणखीन किती काळ आरोपीला तुरूंगात ठेवणार? असा प्रमुख सवाल या याचिकेतून उपस्थित करण्यात आला होता.
सीबीआय न्यायालयाने फेटाळली होती याचिका -
शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी (Indrani Mukherjee the main accused in the Sheena Bora murder case) इंद्राणी मुखर्जीने सीबीआय कोर्टामध्ये दाखल केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. हा अर्ज इंद्राणी मुखर्जीने कारागृहात इतर कैद्यांप्रमाणे साडी न नेसण्यासाठी सूट मिळावी म्हणून दाखल केला होती. यात इंद्राणी मुखर्जीने युक्तिवाद केला होता की, कारागृहातील ज्या महिला कैद्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांचा पोशाख हिरव्या साडीचा आहे. मात्र, माझ्यावर अद्यापही खटला चालू असून कारागृहातील हिरव्या साडीचा पोशाख न घालण्यासाठी सूट मिळावी म्हणून तिने सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश जे.सी जगदाळे यांच्यासमोर अर्ज दाखल केला होती.
हेही वाचा -Girls Marriage legal Age : मुलींचं लग्नाचं वय वाढणार, मोदी सरकार मोठा निर्णय, आता १८ ऐवजी?