मुंबई शीना बोरा हत्याकांडातील Sheena Bora murder case मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची Indrani Mukherjees मुलगी विधी पीटर मुखर्जी Vidhi Peter Mukherjee application in special cbi court हिने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये तिची आई इंद्राणी मुखर्जी सोबत राहण्याची परवानगी करिता अर्ज दाखल केला आहे या अर्जावर तपास यंत्रणेला उत्तर सादर करण्याचे निर्देश सीबीआय कोर्टाने दिले असून यावर पुढील सुनावणी 7 सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.
आईच्या सहवासापासून दूर ठेवण्यात आल्याचा दावाआरोपी इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांची मुलगी विधी मुखर्जी हे गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्ये राहत आहेत. इंद्राणी मुखर्जी ला शीना बोराच्या हत्याकांडात अटक करण्यात आल्यानंतर इंद्राणी मुखर्जी आणि विधी हे दोघेही अलग अलग राहत होत्या तेव्हापासूनच विधी लंडनमध्ये वास्तव्यास असल्याने ती आता पुन्हा भारतात दहा सप्टेंबर रोजी परत येणार असल्याने तिने आई इंद्राणी मुखर्जी सोबत राहण्याची परवानगी सीबीआय कोर्टामध्ये मागितली आहे. 2015 मध्ये जेव्हा इंद्राणी मुखर्जीला तिची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली तेव्हा तिला अल्पवयीन असल्याने तिला तिच्या आईच्या सहवासापासून दूर ठेवण्यात आल्याचा दावा विधीने केला आणि विभक्त झाल्यामुळे तिच्या भावनिक आरोग्यावर परिणाम झाला. विधी अनेक वर्षांपासून लंडनमध्ये राहत आहे. तिच्या अर्जानुसार ती 10 सप्टेंबरला भारतात परतत आहे.
आईला अटक करण्यात आली तेव्हा अल्पवयीन होतीवकील रणजीत सांगळे यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत विधी म्हणाली की 2015 मध्ये जेव्हा तिच्या आईला अटक करण्यात आली तेव्हा ती अल्पवयीन होती अटक झाल्याच्या दिवसापासून ती तिच्या आईच्या सहवास, प्रेम आणि उबदारपणापासून वंचित आहे. गेल्या सात वर्षांपासून ती तिच्या आई पासून दूर राहत आहे. याचा अर्जदाराच्या भावनिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे असे त्यात म्हटले आहे. विधीला आता वेगळेपणाचा सामना करणे अत्यंत कठीण जात आहे म्हणूनच तिला तिच्या आईसोबत मुक्तपणे संवाद साधता यावा आणि तिच्यासोबत राहता यावे इच्छा आहे.