मुंबई -शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी यांनी मंगळवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात धाव घेतली. दोषींना तुरूंगात जे कपडे परिधान करावे लागतात ते न घालण्यास सूट देण्याची विनंती केली. भायखला महिला तुरूंगात कैद असलेली इंद्रायणी मुखर्जी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, तुरूंग अधिकारी ज्यांच्यावर न्यायालयीन खटला सूरू आहे जे दोषी नाही त्यांना सुद्धा दोषींसाठीचा ड्रेस कोड घालण्यास सांगत आहेत. कोर्टाने तुरूंग अधिकाऱ्यांना या संदर्भात 5 जानेवारीला उत्तर मागितले आहे.
सीबीआयच्या विशेष कोर्टात धाव
ऑगस्टमध्ये मुंबईतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची जामीन याचिका फेटाळून लावली. जामीन फेटाळून लावताना, जामिनावर सुटल्यानंतर आरोपींनी फिर्यादीवरील साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. एप्रिल 2012 मध्ये पेणच्या जंगलात शीना बोराची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात इंद्राणी व पीटर व्यतिरिक्त इंद्राणीचा माजी पती संजीव खन्नाही खुनाच्या आरोपाखाली तुरूंगात आहे.
इंद्राणीशी लग्न करण्यापूर्वी पीटरला दोन मुलगे आहेत. त्याच वेळी, इंद्राणीला तिच्या पूर्वीच्या पतीपासून मुलगा मिखाईल असून मुलगी शीना होती. याशिवाय आणखी एक मुलगी विधी ही माजी पती संजीव खन्नाची आहे. दोघे तुरूंगात जाण्यापूर्वी विधी लंडनमध्ये इंद्राणी आणि पीटरसमवेत राहत होते.