मुंबई -समुद्र पर्यटनाला आणि विदेशी पार्टनरला चालना देण्यासाठी भारताला जागतिक समुद्र पर्यटन केंद्राचे स्थान निर्माण करण्यासाठी मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे १४ व १५ मे, २०२२ या कालावधीत पहिली अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय समुद्रपर्यटन परिषद २०२२ ची ( International Cruise Conference in Mumbai ) घोषणा गुरुवारी (दि. २१ एप्रिल) बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ( Minister Sarbananda Sonowal ) आयोजित ऑनलाइन पत्रकार परिषदेत केली आहे.
समुद्रपर्यटन दहा पटीने वाढणार -केंद्रीय मंत्री सर्बानन्द सोनोवाल पत्रकारांशी बोलताना म्हणाले,की “आंतरराष्ट्रीय समुद्रपर्यटनावरील परिषदेचे उद्दिष्ट भारताला क्रूझ प्रवाशांसाठी एक इच्छित स्थळ म्हणून दर्शवणे, प्रादेशिक कनेक्टिव्हिटीवर प्रकाश टाकणे आणि समुद्रपर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी भारताच्या तयारीबद्दल माहिती प्रसारित करणे आहे. या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत, आंतरराष्ट्रीय आणि भारतीय क्रूझ लाइन ऑपरेटर, गुंतवणूकदार, जागतिक क्रूझ सल्लागार, तज्ज्ञ, गृह, वित्त, पर्यटन आणि बंदरे आणि जहाजबांधणी मंत्रालयातील वरिष्ठ सरकारी अधिकारी, राज्य सागरी बोर्ड, राज्य पर्यटन मंडळे, वरिष्ठ बंदर अधिकारी, नदी क्रूझ ऑपरेटर, टूर ऑपरेटर आणि ट्रॅव्हल एजंट अशा सर्व भागधारकांचा सहभाग असेल. भारत एक भव्य समुद्रपर्यटन केंद्र बनण्यासाठी तयारीत आहेत. भारतीय समुद्रपर्यटनामध्ये पुढील दशकात दहा पटीने वाढ होण्याची क्षमता असल्याची माहीतीही सर्बानन्द सोनोवाल यांनी दिली.