महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 15, 2022, 1:51 PM IST

ETV Bharat / city

Stocks Opening : सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ, बाजारात उत्साहाचे वातावरण

जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमुळे शुक्रवारी शेअर बाजाराचे ( Stock market ) व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी मजबुतीसह उघडले. प्रारंभीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३३९.८१ अंकांनी वाढला. यापूर्वी चार दिवस शेअर बाजारात घसरण होती. सकाळीच सेन्सेक्सने उसळी मारल्याने बाजारामध्ये उत्साहाचे वातावरण ( Excitement in the stock market ) दिसून आले.

STOCKS OPENing
STOCKS OPENing

मुंबई : जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमुळे शुक्रवारी शेअर बाजाराचा ( Stock market ) सेन्सेक्स आणि निफ्टी मजबूतीसह उघडले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३३९.८१ अंकांनी वाढला. यापूर्वी चार दिवस शेअर बाजारात घसरण होती. यादरम्यान बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक ३३९.८१ अंकांनी वाढून ५३,७५५.९६ वर पोहोचला. दुसरीकडे, एनएसई निफ्टी 72.35 अंकांनी वाढून 16,011 वर होता. हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, नेस्ले, लार्सन अँड टुब्रो, एशियन पेंट्स, टायटन, मारुती, कोटक महिंद्रा बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढले.

विप्रो, टाटा स्टील, एचसीएल टेक्नॉलॉजीज, अॅक्सिस बँक, टेक महिंद्रा आणि बजाज फायनान्सचे समभाग घसरले. इतर आशियाई बाजारांमध्ये टोकियो आणि सेऊल बाजारातही चांगला हालचाल दिसून आली. तर शांघाय आणि हाँगकाँग तोट्याने व्यवहार करत होते. मागील सत्रात, बीएसईचा 30 समभागांचा सेन्सेक्स गुरुवारी 98 अंकांनी किंवा 0.18 टक्क्यांनी घसरून 53,416.15 अंकांवर बंद झाला होता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही 28 अंकांनी किंवा 0.18 टक्क्यांनी घसरला आणि सुरुवातीचा फायदा गमावून 15,938.65 वर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय ऑईल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.99 टक्क्यांनी वाढून 100.08 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी 309.06 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. विदेशी गुंतवणूकदारांच्या शेअर्स खरेदीने बाजारात उत्साहाचे वातावरण ( Excitement in the stock market ) दिसून आले.

हेही वाचा -India and Maharashtra Rain Update : देशभरासह महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; नद्यांना पूर, शाळांना सुट्टी

ABOUT THE AUTHOR

...view details