मुंबई- नौदल दिनानिमित्त मुंबईत भारतीय नौदलाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात आयोजित विशेष कार्यक्रमात जवानांनी परेड आणि चित्तथरारक कसरती सादर केल्या.
नौदल दिनानिमित्त 'गेट वे ऑफ इंडिया' येथे चित्तथरारक कसरती भारतीय नौदल 17 व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना "भारतीय नौदलाचे जनक" मानले जाते. इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरुवात झाली. इ.स. १९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय नौदलाने चढवलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळवणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढवण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते. याच नौदल दिनानिमित्त आज मुंबईत गेट ऑफ इंडिया येथे नौदलाची खास परेड करण्यात आली व आपल्या नौदलाच्या सर्व तुकड्यांनी सलामी दिली. यावेळी नौदलप्रमुख करमबीर सिंग तसेच मुंबईतून व राज्यभरातून सिनेतारक, नौदल अधिकाऱ्यांचे कुटुंबीय आणि सामान्य लोक परेड पाहण्यासाठी आले होते. जाबाज नौदलाच्या कसरती पाहून उपस्थित लोक थक्क झाले.
भारतीय नौदलाबद्दल जाणून घ्या -
भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या ताफा आहेत. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकूश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.