महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Corona update Today : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, देशात २४ तासात १७,०७० नवीन कोरोना रुग्ण - corona cases today

एकीकडे देशात मान्सून सक्रिय होत आहे. तर दुसरीकडे देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत ( corona cases today ) आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या ( Maharashtra corona update ) महाराष्ट्रात आहे.

corona update
कोरोना अपडेट

By

Published : Jul 1, 2022, 9:36 AM IST

मुंबई-देशात २४ तासात कोरोनाचे १७,०७० नवीन रुग्ण आढळले ( India corona cases ) आहेत. तर गेल्या २४ तासांत कोरोनाने २३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1,07,189 झाली ( India corona update today ) आहे. तर पॉझिटिव्हिटीचा दर ३.४० टक्के ( corona positivity rate ) आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १४ हजार १२९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १५०४ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १०.६४ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज ३ मृत्यूची नोंद झाली आहे. १६४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ११ हजार २२७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ७९ हजार ७७४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात-आरोग्य विभागाने गुरुवारी दिलेल्या आकडेवारीनुसार २४ तासांत नवीन कोरोना रुग्णांचे प्रमाण तुलनेत 45.4 टक्के अधिक आहे. देशात एकूण 4,34,07,046 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 24 तासात एकूण 4,53,940 लोकांचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. केवळ महाराष्ट्रात 38.03 टक्के नवीन रुग्ण- पाच राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात महाराष्ट्र अव्वल स्थानावर ( Covid cases in Maharashtra today ) आहे. येथे 6,493 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यानंतर केरळमध्ये 3,378, दिल्लीत 1,891, तामिळनाडूमध्ये 1,472 आणि उत्तर प्रदेशमध्ये 572 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. नवीन प्रकरणांपैकी 80.87% या पाच राज्यांमध्ये नोंदवले गेले आहेत. एकट्या महाराष्ट्रात ३८.०३% नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनातून बरे होण्याचा दर आता 98.57 टक्के आहे. एकूण मृतांची संख्या 5,25,020 झाली आहे.

ही आहे कारणे -पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणत नागरिक हे बाधित होत होते. नागरिकांच्या मनात भीती होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणत पाहिलं लसीकरण डोस घेण्यात आल. त्यानंतर ही काही नागरिकांकडून तसेच शासनाच्या आवहानानंतर दुसऱ्या डोससाठी नागरिक पुढे आले. पण त्याच वेळी तिसरी लाट ओसरली आणि निर्बंध शिथिल झाले आणि त्यामुळे ज्या प्रमाणात दुसऱ्या डोससाठी आणि बूस्टर डोससाठी नागरिक पुढे यायला पाहिजे होत, तेवढ्या प्रमाणत नागरिक पुढे आलेले नाही. तसेच जी काळजी पूर्वी नागरिकांकडून घेतली जात होती. तशी काळजीदेखील नागरिकांकडून घेतली जात नाही. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे BA4 आणि BA5 सब-व्हेरिएंटचा प्रसार वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे डॉ.उदय भुजबळ यांनी दिली आहे.

जवळजवळ 99 टक्क्याहून अधिक रुग्ण हे असिमटेमिक -सध्या जे नवीन व्हेरीयंटचे नवीन रुग्ण सापडत आहे. त्या रुग्णांना एक ते दोन दिवस ताप येणे, अंग दुखी, सर्दी, खोकला, अशी लक्षणे दिसून येत आहे. तर यात विशेष म्हणजे कोणीही जास्त प्रमाणत सिरयस झालेलं नाही. कोणालाही ऑक्सिजनची गरज लागणे, व्हेंटिलेटरची गरज लागणे अशी परिस्थीती निर्माण झालेली नाही. जवळजवळ 99 टक्के हून अधिक रुग्ण हे असिमटेमिक आहे. आणि ते रुग्ण होम आयसोलेशन मध्ये उपचार घेत आहे. परंतु यात ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे.ज्यांना आजार जास्त आहे.अश्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. असं देखील यावेळी डॉ उदय भुजबळ यांनी सांगितल.

असे रुग्ण देखील होत आहे बाधित -जे रुग्ण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत देखील पॉझिटिव्ह आले आहेत असे रुग्ण देखील या नवीन व्हेरीयंट मध्ये बाधित होत आहे.पण त्यांच्यातील जो आजार आहे तो अत्यंत माईल्ड स्वरूपाचा आहे. असं देखील यावेळी डॉ उदय भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा-COVID19: भारतात गेल्या 24 तासात 14,506 नवीन कोरोना रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

हेही वाचा-Mumbai Corona Update: १५०४ रुग्णांची नोंद, ३ मृत्यू, २४ व्हेंटिलेटरवर

हेही वाचा-corona update: भारतात गेल्या 24 तासात 18,819 नवीन कोरोना रुग्ण, 39 जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details