मुंबई-कोरोनाचे देशात ८८२२ रुग्ण , २.०५ पॉझिटिव्हिटी दर ( corona cases in Maharashtra ) आढळला आहे. मुंबईत रोज १७०० ते १९०० रुग्णांची ( New corona case new Mumbai ) नोंद होत आहे.
कोरोनाचे देशात ८८२२ रुग्ण २४ तासात आढळले आहेत. ५७१८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये मे महिन्यापासून पुन्हा कोरोना विषाणूने डोकेवर काढले ( Corona Increasing in Mumbai ) आहे. रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होत आहे. कोरोना रुग्ण आढळून येणारी इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात येत होती. मात्र सध्या कोरोना रुग्ण आढळून आलेली मुंबईमधील एकही इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात आलेली ( No sealed buildings in Mumbai ) नाही. इमारती आणि मायक्रो कंटेंटमेंट झोन सील करण्याबाबत नव्या गाईडलाईनची अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे मुंबईतील एकही इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात आलेली नाही अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
म्हणून इमारती सील नाहीत -मुंबईत सध्या रुग्णसंख्या वाढत असली तरी ९६ ते ९७ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची किंवा ऑक्सिजनची आवश्यकता भासत नाही. त्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे. यामुळे मुंबईत रुग्णसंख्या वाढली तरी भीतीचे कारण नाही. पालिकेचे त्यावर लक्ष आहे. नवीन नियमावली प्रमाणे २० टक्के घरांमध्ये रुग्ण आढळून आले तरच इमारत सील करता येते. या नियमावलीमुळे मुंबईत एकही इमारत, झोपडपट्टी सील नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.