मुंबई- भारतामध्ये शुक्रवारी कोरोनाचे 15,940 नवीन रुग्ण आढळले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ( India corona update ) दिली. देशात गेल्या 24 तासांत या आजारातून तब्बल 12,425 बरे झाले आहेत. देशाचा प़ॉझिटिव्हटी दर 4.39 टक्के आहे
India corona update : देशांत २४ तासांत कोरोनाचे ११, ७३९ रुग्ण - महाराष्ट्र कोरोना अपडेट
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत एकूण 86.02 कोटी चाचण्या घेण्यात आल्या आहेत, त्यापैकी 3,63,103 चाचण्या एकट्या गेल्या 24 तासांत घेण्यात आल्या आहेत
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत एकूण 86.02 कोटी चाचण्या घेण्यात आल्या आहेत, त्यापैकी 3,63,103 चाचण्या एकट्या गेल्या 24 तासांत घेण्यात आल्या आहेत.
मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ ( Maharashtra corona cases today ) लागली आहे. गेले पाच दिवस २ हजारांवर रुग्ण आढळून येत होते. कोरोना रुग्णांची नोंद होणाऱ्या आयसीएमआर पोर्टल सुरू नसल्याने आज ( 25 जून ) केवळ ८४० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ६६८ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ८४ रुग्ण ऑक्सिजनवर, १६५ रुग्ण आयसीयूमध्ये तर २३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
१०.८६ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह -मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासांत ७ हजार ७३३ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८४० नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १०.८६ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज ३ मृत्यूची नोंद झाली आहे. २०५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४ हजार ६०० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ७२ हजार ९६३ रुग्ण बरे झाले आहेत. तर, १९ हजार ५९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२ हजार ०४३ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४०० दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१६७ टक्के इतका आहे.