मुंबई - गेल्या 24 तासांत 20,528 कोरोना रुग्णांची ( Corona patient ) नोंद असून 49 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार 18,301 रुग्णांना घरी सोडण्यात ( Corona patient discharges ) आले. दरम्यान, कोरोनावरील लस फार काळ त्यापासून संरक्षण करू शकत नाही असे एका अभ्यासात लक्षात आले आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस घेणे गरजेचे आहे, असे सांगितले जात आहे. कालपासूनच 75 दिवसांची बुस्टर डोसची देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे.
मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन दिवसाला २ हजारावर रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. गेले दोन दिवस ४०० च्या खाली रुग्णसंख्या नोंद होत आहे. आज ३६५ रुग्णांची नोंद झाली आहे. २ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २७० बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनावरील लस फार काळ त्यापासून संरक्षण करू शकत नाही असे एका अभ्यासात लक्षात आले आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस घेणे गरजेचे आहे, असे सांगितले जात आहे. कालपासूनच (शुक्रवार) 75 दिवसांची बुस्टर डोसची देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे.
कोरोना वाढीचा दर ०.०३५ टक्के -मुंबईत गेल्या २४ तासात ११ हजार ४४२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३६५ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ३.१९ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. ५२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २० हजार ५३७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९८ हजार २६८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ६४० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १९७० दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०३५ टक्के इतका आहे.