मुंबई - कॉर्डिलिया क्रूझवरील ड्रग पार्टीसंदर्भात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची अटक, पूर्वनियोजित कट होता. हे एनसीबीच्या क्लिनचिटमधून आता स्पष्ट झाले आहे. एनसीबीच्या माध्यमातून महाराष्ट्र म्हणजे ड्रग्जचे राज्य असे चित्र निर्माण करून महाराष्ट्राची देशात प्रचंड बदनामी करण्यात आली. त्यामुळे कॉर्डिलियासह समीर वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
कार्डिलिया ड्रग्ज पार्टी प्रकरण -कार्डिलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे, हे सुरुवातीपासूनच दिसून येत होते. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्र अस्थिर करण्याच्या षड्यंत्राचाच हा एक भाग होता. कॉर्डिलिया छापेमारीमध्ये भाजपाशी संबंधित लोकांचा थेट एनसीबी कार्यालयात उघड वावर होता. ही कारवाई करण्यासाठी गुजरातपासून कसा सापळा रचला होता याचा मंत्री नबाव मलिक यांनी पर्दाफाश केला होता. नवीन मलिक यांचे आरोप हे खरे होते हे आज स्पष्ट झाले आहे. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नसतानाही त्याला कोठडीत डांबून ठेवले होते. आता एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानचे नावही नाही. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी बॉलिवूडसह मुंबई व महाराष्ट्राचे नाव बदनाम करण्याचे काम केले आहे, असे लोंढे म्हणाले.
सरकार पाडण्यासाठी भाज पक्षाचा प्रयत्न - महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पक्ष काम करत आहे. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, एनआयए, एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून बनावट कारवाया करण्यात आल्या. मंत्री नवाब मलिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेसुद्धा अशा षड्यंत्राचेच बळी ठरले आहेत. अभिनेता सुशांतसिंह, प्रकरणातही राज्य सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले गेले. पण सत्य अखेर सत्य असते ते लपत नाही, हे एनसीबीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने मात्र महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या या महाराष्ट्रद्रोहींची चौकशी करून त्यांना जेलची हवा दाखवावी, असेही लोंढे यांनी म्हटले आहे.
समीर वानखेडेंच्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करा - काँग्रेसची मागणी - Independent inquiry into all actions of Sameer Wankhede
कॉर्डिलियासह समीर वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
एनसीबीच्या समीर वानखेडेंच्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करा