शिवसेना भवन परिसरातील सुरक्षा वाढवली; भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात - नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात झाली. ते आज मुंबईत दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून नारायण राणे आपल्या आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली आहेत. मात्र नारायण राणे यांना स्मृतीस्थळी फिरकू देणार नाही, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला असल्याने शिवसेना भवन परिसर, शिवाजी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
सुरक्षा वाढवली
मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात झाली. ते आज मुंबईत दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून नारायण राणे आपल्या आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली आहेत. मात्र नारायण राणे यांना स्मृतीस्थळी फिरकू देणार नाही, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला असल्याने शिवसेना भवन परिसर, शिवाजी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.