महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Fire on railway Tracks Area : मध्य रेल्वे मार्गावर सतत आगीचा घटना; वाहतुकीवर परिणाम - मुंबई मध्य, हार्बर रेल्वेवर आगीच्या घटना

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गालगत प्रचंड प्रमाणात कचऱ्याचे ढिग तयार झाले आहेत. पावसाळ्यात हिरवेगार दिसणारे गवत आता सुकलेल्या अवस्थेत आहे. या सुकलेल्या गवताचे प्रमाण देखील अधिक आहे. हार्बर मार्गावर प्रत्येक स्थानकादरम्यान हेच चित्र दिसून येते. त्यामुळे, उन्हाच्या कडाक्याने किंवा रेल्वेलगत राहणाऱ्या रहिवाशांकडून आग लागण्याचे प्रकार होत असल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांकडून मांडण्यात येत आहे.

रेल्वे मार्गावर लागलेली आग
रेल्वे मार्गावर लागलेली आग

By

Published : Mar 17, 2022, 7:27 PM IST

मुंबई -सध्या मुंबई आणि उपनगरता उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे रेल्वे लगत असलेला कचरा आणि सुका गवताला आग लागण्याच्या घटना घडत असल्याची माहिती समोर येत आहे. मध्य, हार्बर रेल्वेवर मागील दोन-तीन दिवसांपासून वेगवेगळ्या स्थानकादरम्यान आग लागण्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होताना दिसून येत आहे.

रेल्वेची डोके दुखी वाढली

मिळालेल्या माहीनुसार, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गालगत प्रचंड प्रमाणात कचऱ्याचे ढिग तयार झाले आहेत. पावसाळ्यात हिरवेगार दिसणारे गवत आता सुकलेल्या अवस्थेत आहे. या सुकलेल्या गवताचे प्रमाण देखील अधिक आहे. हार्बर मार्गावर प्रत्येक स्थानकादरम्यान हेच चित्र दिसून येते. त्यामुळे, उन्हाच्या कडाक्याने किंवा रेल्वेलगत राहणाऱ्या रहिवाशांकडून आग लागण्याचे प्रकार होत असल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांकडून मांडण्यात येत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून कल्याण, भिवपुरी, खारकोपर आग लागण्याच्या घटना झाल्याची नोंद झाली आहे. या आगीचा घटनेत आतापर्यत मोठे नुकसान झालेले नाही. मात्र, सतत लागत असलेल्या आगमीमुळे रेल्वेची डोकेदुखी वाढली आहे.

रेल्वेच्या सुरक्षा विभाग सज्ज

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे मार्गावर आगी लागण्याचा सतत घटना घडत आहे. यामुळे रेल्वेचे सुरक्षा विभाग सज्ज झाले आहे. सध्या मुंबईसह उपनगरत उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. यामुळे रेल्वेने खबरदारी म्हणून रेल्वे मार्गावर सुरक्षेचा दृष्टीने पेट्रोलिंग वाढवली आहे. याशिवाय जिथे- जिथे सुखा कचरा आणि गवत दिसत आहे. तिथे रेल्वेकडून उपायोजना केल्या जात आहे. विशेष म्हणजे प्रत्येक स्थानकावर दरम्यान रेल्वे मार्गवरील चौखपणे देखरेख ठेवण्यात येत आहे.

आगीच्या घटना कमी

रेल्वे लगतचा परिसरात आग लागण्याचा घटना थांबविण्यासाठी सगुणा रूरल फाऊंडेशनच्यावतीने वाळा, असाट, शिंगी, निर्गुडी, रान केळी ही स्थानिक वनस्पती रेल्वे रूळालगत, डोंगराळ भागावर, डोंगराच्या उतारावर लावली गेली आहेत. आगीच्या घटना कमी करण्यास या स्थानिक वनस्पतीद्वारे मातीची धूप होणे, दरड कोसळण्याच्या घटनांवर प्रतिंबध करणे काम केले जाते. दरम्यान, आवश्यकतेनुसार अशाच प्रकारच्या वनस्पती प्रत्येक ठिकाणी लावणे आवश्यक आहे. जेणेकरून रेल्वे सेवा ठप्प होणार नाही. तर, कोणतीही जीवितहानी, वित्तहानी होणार नाही, असे मत प्रवाशांकडून मांडण्यात आले.

हेही वाचा -VBA Protest Against Fertilizer Price Hike : खतांचे दर वाढण्याची शक्यता.. वंचित बहुजन आघाडीचे 'पुंगी बजाव' आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details