मुंबई -हेरगिरीच्या आरोपांदरम्यान मुंबई पोलिसांनी गुरुवारी एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांची सुरक्षा वाढवली आहे. वानखेडे सध्या क्रूझवर सापडलेल्या अमली पदार्थांच्या तपासावर देखरेख करत आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला, वानखेडे यांनी दावा केला होता की, दोन पोलीस त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांचा सुरक्षेसाठी आणखी 4 पोलीस तैनात केले आहेत. वानखेडे वापरत असलेल्या वाहनाची जागा त्यांच्या नवीन सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून एक एसयूव्ही देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील एनसीबी कार्यालयाबाहेर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे, अशी माहिती मिळत आहे.
पाळत ठेवत असल्याची समीर वानखेडेंची तक्रार -