मुंबई -कोरोना संसर्ग वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊनची भीती सर्वसामान्यांना वाटत आहे. लॉकडाऊन लागणार अशी चर्चा सुरू आहे. यामुळे व्यसन असणाऱ्यांनी खबरदारी घेत आधीच दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट यांचा साठा करायला सुरुवात केली आहे.
मागील वर्षी लॉकडाऊनदरम्यान गुटखा, तंबाखूचं व्यसन असणाऱ्यांची मोठी अडचण झाली होती. तंबाखूजन्य पदार्थ मिळत नव्हते. लॉकडाऊन काळात जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश होते. त्यामुळे यावेळी लॉकडाऊन लागण्याची चर्चा सुरू असतानाच नागरिक दारू, तंबाकू, गुटखा, सिगारेट यांचा साठा करत आहेत.
लॉकडाऊनच्या भीतीने तंबाखू, सिगारेटच्या विक्रीत वाढ तंबाखू, सिगारेटच्या मागणीत वाढ
मागच्या वर्षी तंबाखूच्या एका पुडीची किंमत 50 ते 60 रुपयांवर पोहोचली होती. यामुळे यंदा हा अनुभव नको म्हणून अगोदरच साठा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तंबाखू, सिगारेट यांची मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गेल्या वर्षी तंबाखूच्या पुडीवरून मारहाणीच्या देखील घटना घडल्या होत्या. त्यामुळे यंदा अशी परिस्थिती नको म्हणून आधिच तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करण्यात येत आहे.
हेही वाचा -पुणे पोलिसांनी शेअर केला व्हिडिओ; मास्क न घालण्यासाठी आता काय द्याल कारण?