मुंबई- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी पुन्हा एकदा सर्वसामन्य मुंबईकरांसाठी लोकलचे दार बंद केले होते. फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा दिली आहे. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे लाॅकडाऊनच्या नियमात शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 15 दिवसात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्या तब्बल 31 लाखांपर्यंत पोहचली आहे.
इंधन दर वाढीमुळे बेकायदेशीर प्रवास-
'ब्रेक द चेन' अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील, वैद्यकीय सेवेतील, रुग्ण, दिव्यांग यांना लोकल प्रवासात परवानगी दिली आहे. मात्र,आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने अनेक नागरिक आता कार्यलय जाणे सुरु केले आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना लोकल प्रवासात मुभा नसली तरी अनधिकृतपणे प्रचंड प्रमाणात नागरिक लोकलने प्रवास करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आगोदरच पेट्रोलच्या शंभरी ओलांडल्यामुळे कमी पगार असणाऱ्या सामान्य मुंबईकरांना दुचाकीचा रोजचा खर्च ही पेलवेना झाला आहे. कारण मुंबईत कामाला येणारे अनेक नागरिक कल्याण-कसारा, कर्जत, खोपोली, वसई-विरार, नालासोपारा या भागातून येतात. मात्र, इंधन दरवाढीमुळे रस्ते मार्गाने मुंबई गाठणे खिशाला परवडणारे नसल्याने आणि पैशांचा अपव्यय होत असल्याने अनधिकृतपणे सर्वसामान्य प्रवासी लोकल प्रवास करत आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसात लोकलची प्रवासी संख्या वाढली आहे.
एसटीच्या बसेस बंद केल्याने प्रवाशांचे हाल-