महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत वाढ; मृत्यूसंख्या कमी - स्क्रब टायफस

राज्यात स्वाईन फ्लू, लेप्टो, स्क्रब टायफस, हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, जपानी मेंदूज्वर, इतर मेंदूज्वर, केएफडी म्हणजेच मकडताप, चंडीपुरा या साथीच्या आजारामुळे 2018 मध्ये 598 मृत्यू झाले होते. 2019 मध्ये 207 मृत्यू झाले होते. 2020 त्यात घट होऊन 34 मृत्यूची नोंद झाली.

मृत्यूसंख्या कमी
मृत्यूसंख्या कमी

By

Published : Oct 25, 2021, 5:07 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रसार सुरूअसल्याने त्याला रोखण्याचे काम आरोग्य विभागाला करावे लागत आहे. चार वर्षाच्या तुलनेत यावर्षी हिवताप, डेंग्यू आणि चिकुनगुन्या या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर चार वर्षांत साथीच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या घटल्याने घटली आहे. साथीच्या आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मृत्यूसंख्या घटली
राज्यात स्वाईन फ्लू, लेप्टो, स्क्रब टायफस, हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, जपानी मेंदूज्वर, इतर मेंदूज्वर, केएफडी म्हणजेच मकडताप, चंडीपुरा या साथीच्या आजारामुळे 2018 मध्ये 598 मृत्यू झाले होते. 2019 मध्ये 207 मृत्यू झाले होते. 2020 त्यात घट होऊन 34 मृत्यूची नोंद झाली. तर 2021 मध्ये 36 मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या चार वर्षापेक्षा 2020 मध्ये मृत्यू संख्या कमी झाली होती. 2020 पेक्षा 2021 मध्ये गेल्या दहा महिन्यात मृत्यूच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. तसेच 2018 ते 2020 या तीन वर्षांच्या तुलनेत 2021 मध्ये हिवताप, डेंग्यू व चिकुनगुन्या या तीन आजारांचे रुग्ण वाढल्याचे दिसत आहे.

2018 मध्ये 598 रुग्णांचा मृत्यू
2018 मध्ये स्वाईन फ्लूचे 2594 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 462 रुग्णांचा मृत्यू झाला होता. लेप्टोचे 309 रुग्ण आढळून आले त्यापैकी 13 रुग्णांचा मृत्यू झाला होता. स्क्रब टायफसचे 398 रुग्ण आढळून आले असून 36 रुग्णांचा मृत्यू झाला होता. हिवतापाचे 10 हजार 757 रुग्ण आढळून आले तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूचे 11 हजार 38 रुग्ण आढळून आले त्यापैकी 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिकनगुन्याचे 1026, जपानी मेंदूज्वर आजाराचे 6 रुग्ण आढळून आले त्यापैकी 1 जणाचा मृत्यू झाला आहे. इतर मेंदूज्वर आजाराचे 48 रुग्ण आढळून आले होते त्यापैकी 1 जणांचा मृत्यू झाला होता. केएफडी म्हणजेच माकडतापाचे 109 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर चंडीपुरा आजाराचे 6 रुग्ण आढळून आले होते. 2018 मध्ये विविध आजारांनी 598 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

2019 मध्ये 207 रुग्णांचा मृत्यू
2019 मध्ये स्वाईन फ्लूचे 2121 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 197 रुग्णांचा मृत्यू झाला होता. लेप्टोचे 138 रुग्ण आढळून आले त्यापैकी 1 रुग्णाचा मृत्यू झाला होता. स्क्रब टायफसचे 9 रुग्ण आढळून आले होते. हिवतापाचे 4 हजार 71 रुग्ण आढळून आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूचे 2 हजार 64 रुग्ण आढळून आले त्यापैकी 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिकुनगुन्याचे 298, जपानी मेंदूज्वर आजाराचे 31 रुग्ण आढळून आले त्यापैकी 1 जणाचा मृत्यू झाला आहे. इतर मेंदूज्वर आजाराचे 107 रुग्ण आढळून आले होते. केएफडी म्हणजेच माकडतापाचे 82 रुग्ण आढळून आले होते त्यापैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर चंडीपुरा आजाराचा 1 रुग्ण आढळून आला होता. 2019 मध्ये विविध आजारांनी 207 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

2020 मध्ये 34 रुग्णांचा मृत्यू -
2020 मध्ये स्वाईन फ्लूचे 121 रुग्ण आढळून आले होते त्यापैकी 3 रुग्णांचा मृत्यू झाला होता. लेप्टोचे 103 रुग्ण आढळून आले त्यापैकी 3 रुग्णाचा मृत्यू झाला होता. स्क्रब टायफसचे 7 रुग्ण आढळून आले होते. हिवतापाचे 12 हजार 909 रुग्ण आढळून आले तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूचे 3 हजार 356 रुग्ण आढळून आले त्यापैकी 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिकुनगुन्याचे 782, जपानी मेंदूज्वर आजाराचे 2 रुग्ण आढळून आले त्यापैकी 1 जणाचा मृत्यू झाला आहे. इतर मेंदूज्वर आजाराचे 12 रुग्ण आढळून आले होते. केएफडी म्हणजेच माकडतापाचे 16 रुग्ण आढळून आले होते त्यापैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2020 मध्ये चंडीपुरा आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. 2020 मध्ये विविध आजारांनी 34 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

2021 मध्ये 36 रुग्णांचा मृत्यू
2022 मध्ये 20 ऑक्टोबरपर्यंत स्वाईन फ्लूचे 93 रुग्ण आढळून आले होते त्यापैकी 1 रुग्णाचा मृत्यू झाला होता. लेप्टोचे 311 रुग्ण आढळून आले त्यापैकी 9 रुग्णाचा मृत्यू झाला होता. स्क्रब टायफसचे 5 रुग्ण आढळून आले असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हिवतापाचे 11 हजार 154 रुग्ण आढळून आले त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूचे 9 हजार 551 रुग्ण आढळून आले त्यापैकी 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिकुनगुन्याचे 1947, जपानी मेंदूज्वर, इतर मेंदूज्वर व चंडीपुरा आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. केएफडी म्हणजेच माकडतापाचे 7 रुग्ण आढळून आले होते त्यापैकी 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 2020 मध्ये विविध आजारांनी 36 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

या केल्या जात आहेत उपाययोजना
राज्यातील साथरोग व नियंत्रणासाठी साथरोगाचे दैनंदिन सर्वेक्षण केले जात आहे. कीटकजन्य आजारांसाठी कीटक शास्त्रीय सर्वेक्षण केले जात आहे. उपचारासाठी आवश्यक पुरेशी औषध उपलब्ध करण्यात आली आहेत. आजराची लागण झाल्यास सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये उपचारांची सुविधा करण्यात आली आहे. आजारांचे निदान व्हावे यासाठी प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वाईन फ्लू प्रतिबंधासाठी अतिजोखमीच्या व्यक्तींना ऐच्छिक व मोफत लसीकरण केले जात आहे. पाण्याचे गुणवत्ता नियंत्रण केले जात आहे. साथरोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीची स्थापना करण्यात आली आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी लोकांचा सहभाग व जनतेचे आरोग्य यावर शिक्षण दिले जात असल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा -आमची लढाई एनसीबीशी नाही तर चुकीचं काम करणाऱ्यांविरोधात - नवाब मलिक

ABOUT THE AUTHOR

...view details