राज्यातील 'या' जिल्हातील पॉझिटिव्हिटी रेट अधिक असल्याने लॉकडाऊनमध्ये वाढ ! - राज्यातील १४ जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट अधिक
सध्या राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट १०.४६ टक्के आहे. या पॉझिटिव्हिटी रेट पेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट १४ जिल्हयांमध्ये आहे. यामुळे राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
मुंबई - राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट थोपवण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून लॉकडाऊनही लावण्यात आला आहे. गेले दीड महिने असलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जाईल, असे नागरिकांना वाटले होते. मात्र सध्या राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट १०.४६ टक्के आहे. या पॉझिटिव्हिटी रेट पेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट १४ जिल्हयांमध्ये आहे. यामुळे राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
'या' १४ जिल्ह्यांमुळे लॉकडाऊन वाढला -
राज्यात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत राज्य सरकार, आरोग्य विभाग कोरोनाचा प्रसार रोखण्याचे काम करत आहे. पहिली लाट थोपवली म्हणून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. त्याचा फायदा उचलत अनेक ठिकाणी गर्दी होऊ लागली. यामुळे राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रसार झाला. ६२ ते ६७ हजारापर्यंत रुग्ण दररोज आढळून येत होते. तो आकडा आता २५ हजारापर्यंत खाली आला आहे.
राज्यात रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनमधून शिथिलता दिली जाईल, अशी सर्वाना अपेक्षा होती. मात्र राज्यातील १४ जिल्हातील पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याने सरकारने १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यात कोरोना नियंत्रणात आहे. मात्र काही जिल्ह्यात राज्यातील पॉझिटिव्हिटी रेट पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट काही जिल्ह्यात आहे. यामुळे लॉकडाऊनमधून लवकर शिथिलता देणे शक्य नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.