महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Minister Nawab Malik : मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; डी कंपनीच्या मदत घेतल्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे निरीक्षण - Nawab Malik Mumbai Sessions Court

सध्या मलिक हे न्यायालयीन कोठीत आहेत. उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती आहेत. त्यांच्यावर जमीन खरेदी प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकर ( Hasina Parkar ) सोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.

Increase in difficulty of Minister Nawab Malik
नवाब मलिक

By

Published : May 21, 2022, 9:09 AM IST

Updated : May 21, 2022, 2:26 PM IST

मुंबई-अल्पसंख्यांक मंत्री मंत्री नवाब मलिक ( Minority Affairs Minister Nawab Malik ) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. डी कंपनीच्या सदस्यांची ( D Company help ) मदत घेतल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने ( Mumbai Sessions Court ) निरीक्षण नोंदविले आहे. सध्या मलिक हे न्यायालयीन कोठीत आहेत. उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती आहेत. त्यांच्यावर जमीन खरेदी प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकर ( Hasina Parkar ) सोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.



राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गॅंग सोबत संबंध असल्याचा सकृतदर्शनीय पुरावा असल्याचे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने नोंदविले आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. मलिक यांच्या विरुद्धच्या खटल्याची सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या आरोपपत्राची न्यायालयाने दखल घेतली.

नवाब मलिक यांचा थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग होता, असेही न्यायालयाने निरीक्षणात म्हटले आहे. याशिवाय नवाब मलिकांनी गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी कट रचल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी हसीन पारकरसोबत वारंवार बैठका घेतल्या. मनी लाँड्रिंग केले, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले आहे. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी न्यायाधीश रोकडे यांनी असे निरीक्षण नोंदवले की या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी पुरेशी कारणे आहेत. या प्रकरणात नवाब मलिक यांना जाणीवपूर्वक सहभागी करून घेण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पुरावे समोर आले आहेत.

डी गँगमधील लोकांसोबत संबंध-वास्तविक 21 एप्रिल रोजी ईडीने मलिक यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड ताब्यात घेण्यासाठी नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर आणि त्याचा अंगरक्षक सलीम पटेल यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या. दरम्यान नवाब मलिकांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी गँगमधील लोकांसोबत संबंध असल्याचे निरीक्षण नोंदवले गेल्याने त्यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक यांना किडनीचा त्रास-नवाब मलिक यांना किडनीच्या त्रासामुळे त्यांच्यावर कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांच्या खासगी रुग्णालयातील उपचाराच्या अर्जाला परवानगी दिली. त्यानंतर बुधवारी नबाब मलिक यांना आर्थर रोड जेलमधून कुर्ला येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता भरती करण्यात आले आहे. सध्या नवाब मलिक यांच्यावर उपचार सुरु आहे.


काय आहे प्रकरण-फेब्रुवारी महिन्यांत राष्ट्रीय तपास पथकाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, अनिस इब्राहिम, छोटा शकील, जावेद पटेल ऊर्फ जावेद चिकना, टायगर मेमन यांच्यासह इतर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. यावेळी या अधिकार्‍यांनी दाऊदसह त्याची बहीण हसीना पारकर यांच्या कथित गैरव्यवहारासह जमीन खरेदी-विक्रीच्या काही प्रकरणांचा तपास सुरू केला होता.


नवाब मलिक यांची कसून चौकशी-याचदरम्यान कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड येथील मालमत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी खरेदी केल्याचे उघडकीस आले होते. ही जमीन दाऊद इब्राहिमशी संबंधित सहकारी आणि नातेवाईकांच्या नावे होती. ही जमीन नंतर नवाब मलिक यांच्याकडून खरेदी करण्यात आली होती. याच प्रकरणात ईडीने गुन्हा नोंदवून नवाब मलिक यांची कसून चौकशी केली होती. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

किरीट सोमैयांची राजीनाम्याची मागणी - कोर्टानं केलेल्या टिपण्णीनंतर किरीट सोमय्या यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी ठाकरेंची भागीदारी असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. नवाब मलिक यांचे दाऊद गँगशी संबंध असल्याचं प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे दिसतं अशी टिपण्णी कोर्टानं केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मलिक यांचे दाऊद गँगशी संबंध उघड झाले आहेतच. पण त्यांना मंत्रिमंडळात ठेवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही दाऊद गँगशी संबंध निर्माण झाले आहेत का? असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशी मागणीही सोमय्यांनी केली आहे.

मुनिरा यांचा दावा : मुनीरा यांचे वडील फझलभाई गोवावाला यांच्या मृत्यूनंतर 1970 मध्ये मुनीरा व त्यांच्या आईच्या वाट्याला जमिनीचा समान हिस्सा आला. त्यावेळी त्या सात वर्षांच्या होत्या. त्या जमिनीची देखभाल मुस्तफा रंगवाला करायचा. मुनीरा या प्रौढ झाल्यानंतर त्यांनी रेहमान नावाच्या एका व्यक्तीला व्यवस्थापक म्हणून ठेवले. त्यांची आई मरियम गोवावाला यांच्या मृत्यूनंतर 2015 मध्ये मुनीरा या मालमत्तेच्या एकट्या वारसदार बनल्या. त्यावेळी मे. सॉलिड्स इंडस्ट्रीजचे मालक पटेल त्यांच्याकडे यायचे. त्यांची दोन गोदामे या जमिनीवर होती. त्यांनी भाडे रकमेचा धनादेश मुनीरा यांना दिला. जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी मुनीरा यांनी पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी सलीम पटेल नावाच्या व्यक्तीला दिली होती. मात्र या मालमत्तांच्या विक्रीचे अधिकार कोणालाही देण्यात आले नव्हते. मात्र त्यानंतर जमिनीची मालकी पटेल यांच्याकडे कशी गेली त्यांच्याकडून नवाब मलिक यांना कंपनीची आणि जमिनीची मालकी कशी मिळाली याबाबत काहीच माहिती नसल्याचे मुनीरा यांनी ईडीला जबाबात सांगितले.

असा झाला व्यवहार : या जमिनीच्या विक्रीमध्ये सरदार शहावली खान याने प्रमुख भूमिका बजावली. सरदार शहावली खान हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप झाली असून तो तुरुंगात आहेत. सलीम पटेल हा हसीना पारकरचा चालक होता. नवाब मलिक व हसिना पारकर यांनी जमिनीचा मोठा भाग बळकवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मुनीरा यांना धमकावण्यातही आल्याचा आरोप असून, त्यासाठी सॉलीड्स ही कंपनी मलिक यांनी खरेदी केली. त्यामुळे मलिक कुटुंबीय या जागेचे भाडेकरू झाले. ती जागा सलीम पटेलकडील पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीच्या माध्यमातून मालकीची करण्यात आली. उर्वरित जागेची मालकी सलीम पटेलच्या माध्यमातून हसीना पारकरने घेतली असे सरदार खान याने जबाबात म्हटले आहे. त्याबाबत हसिना पारकर व मलिक यांच्यात बैठका झाल्या त्यावेळी आपणही उपस्थित असल्याचा दावा यावेळी खानने त्याच्या जबाबात केला. या जागेवर मलिक यांचे दुकानही होते, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. या जमिनीची किंमत खरेदी खतानुसार तीन कोटी 30 लाख रुपये होती. त्यातील केवळ 15 लाख रुपये मलिक यांच्याकडून भरण्यात आले. या सर्व व्यवहारासाठी तोतया भाडेकरू उभे करण्यात आले असा दावा ईडी कडून करण्यात आला होता.

हेही वाचा-NIA Investigation : मंत्री नवाब मलिक मनी लाँड्रींग प्रकरण, एनआयएकडून सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू

हेही वाचा-Nawab Malik : मंत्री नवाब मलिकांना न्यायालयाचा मोठा दिलासा.. आता कुर्ल्यातील 'या'..

हेही वाचा-Minister Nawab Malik : मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; डी कंपनीच्या मदत घेतल्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे निरीक्षण

Last Updated : May 21, 2022, 2:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details