मुंबई -मुंबईत गेले पावणे दोन वर्ष कोरोना विषाणूचा (Corona virus) प्रसार आहे. हा प्रसार आटोक्यात आहे. थर्टी फर्स्ट आणि ख्रिसमससाठी (Christmas 2021) देश विदेशातून पर्यटक मुंबईत येतात. विदेशात कोरोनाची तिसरी चौथी लाट आली आहे. यामुळे त्या विषाणूचा प्रसार मुंबईत होऊ नये, यासाठी पालिका (Mumbai Municipal Corporation) अलर्टवर असून विमानतळावर कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
कोरोनाचा प्रसार आटोक्यात -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार मुंबईत आहे. या कालावधीत मुंबईमध्ये दोन लाटा येऊन गेल्या. या दोन्ही लाटा आटोक्यात आल्या असून कोरोनाचा प्रसार आटोक्यात आहे. गेल्या वर्षी धार्मिक सणानंतर रुग्णसंख्या वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. जानेवारीपासून लसीकरण सुरु असल्यानेही रुग्णसंख्या आटोक्यात आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगसह तोंडावर मास्क लावणे, गर्दी टाळणे, हात स्वच्छ धुणे या नियमांचे पालन करणे गरजेचे असून लोकांनी याचे पालन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
७ दिवस होम क्वारंटाईन -