मुंबई -महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने धडक कारवाईद्वारे १३३.६८ कोटीच्या रुपयांच्या खोट्या बिलांद्वारे शासनाची १९.९३ कोटी रुपयांची कर चुकवेगिरी करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली आहे. कंपन्यांचे मालक अनिल देवराम जाधव व संतोष अशोक शिंदे यांना महानगर दंडाधिकारी न्यायालयाने या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ( income tax officers arrested Both for Drowning revenue )
14 दिवसांची कोठडी -मे. देवराम ट्रेडर्स व मे. अपोलो एंटरप्राईज या व्यापाऱ्यांच्या उल्हासनगर व नालासोपारा येथील ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी २७ मे २०२२ रोजी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. अन्वेषण भेटी दरम्यान या व्यापाऱ्यांनी बनावट वीजबिल, आधार आणि पॅनकार्डद्वारे नोंदणी प्रमाणपत्र घेतल्याचे आढळून आले. वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत संबंधित कंपन्यांचे मालक अनिल देवराम जाधव व संतोष अशोक शिंदे यांना २७ मे २०२२ रोजी अटक करण्यात आली. महानगर दंडाधिकाऱ्यांनी दि. २७ मे २०२२ रोजी या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.