महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

IT Raid On Yashwant Jadhav : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरूच - यशवंत जाधवांच्या घरी दुसऱ्या दिवशीही छापेमारी सुरूच

मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या ( IT Raid On Yashwant Jadhav Home ) माझगाव येथील घरी काल प्राप्तिकर विभागाने ( Income Tax Department ) धाड टाकली होती. सलग दुसऱ्या दिवशीही हे छापेमारीचे सत्र सुरूच आहे.

यशवंत जाधव
यशवंत जाधव

By

Published : Feb 26, 2022, 8:56 AM IST

मुंबई : 24 तास उलटूनही शिवसेना नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी माझगाव येथे आयकर विभागाची छापेमारी सुरूच ( IT Raid On Yashwant Jadhav Home ) आहे. आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी ठाण मारून बसले आहेत. मध्यरात्रीच्या वेळीत यशवंत जाधव यांना घरातून बाहेर काढल्याचे समजल्यावर शिवसैनिक मोठ्या संख्येने यशवंत जाधव यांच्या घराच्या बाहेर एकत्र झाले. शिवसैनिकांनी आयकार विभागाच्या ( Income Tax Department ) छापेमारीच्या विरोधात घोषणाबाजी केली. स्थानिक पोलिसांनी त्यांना शांत केले तरी रात्रभर शिवसैनिक यशवंत जाधव यांच्या घराबाहेर बसून राहिले.

१५ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

यशवंत जाधव यांच्या माझगावमधील दोन घरांबाबत प्राप्तिकर विभागाचे अधिकारी तपास करत आहेत. त्यासोबत यशवंत जाधव यांचे पीए, पालिकेतील कंत्राटदार यांच्या मुंबईतील एकूण २५ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. या मालमत्तांबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांचा तपास सुरू आहे. माझगाव, काळाचौकी, मालाड, बोरिवली, मुलुंड आदी ठिकाणी या धाडी प्राप्तिकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लाँडरिंग आणि १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी केंद्रीय यंत्रणांकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने या धाडी असल्याचे समजते. दरम्यान यशवंत जाधव यांच्यावर १५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणीही चौकशी सुरू असल्याचे समजते.

कोण आहेत यशवंत जाधव?

यशवंत जाधव हे शिवसेनेचे उपनेते आहेत. शिवसैनिक शाखाप्रमुख ते स्थायी समिती अध्यक्षपदापर्यंत त्यांनी पदे भूषवली आहेत. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. जाधव यांनी महापालिकेत अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केले आहे. स्थायी समितीला मुंबई महापालिकेची तिजोरी समजली जाते. यशवंत जाधव यांच्याकडे अध्यक्ष या नात्याने गेले ४ वर्षे या पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यांची पत्नी यामिनी जाधवही नगरसेविका होत्या. सध्या त्या शिवसेनेच्या आमदार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details