मुंबई -विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवस होत आले, तरी सत्ताधारी महायुतीमधील भाजपा आणि शिवसेकडून आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने सरकार स्थापन झालेले नाही. त्यातच आज मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या जवळच्या कंत्राटदारांवर आज उशिरा इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकली आहे. विशेष म्हणजे हे सर्व कंत्राटदार शिवसेनेच्या जवळचे असल्याने सेनेवर हे दबाव तंत्र असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
हेही वाचा... अयोध्या प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा- फडणवीस
राज्यात 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. मतदारांनी कोणत्याच पक्षाला बहुमत दिले नसल्याने गेल्या 14 दिवसात कोणत्याच पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जात आहे. त्यातच दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याने वाद विकोपाला गेला आहे. यामुळे शिवसेना आणि भाजपा पुन्हा सत्तेसाठी एकत्र येणार नाहीत असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर बोलणी सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. तर मुख्यमंत्रीपदाच्या वाटपाबाबात देवेंद्र फडणवीस खोटे बोलत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा... अयोध्या प्रकरण : आज होणार निकाल जाहीर!