मुंबई-आयकर विभागाकडून मुंबई-पुणे याबरोबरच दिल्ली, हैदराबाद या ठिकाणी दिग्दर्शक अनुराग कश्यप , अभिनेत्री तापसी पन्नू , विकास बहल सह विक्रमादित्या मोट्वाने व मधू वर्मा मंटेना यांच्यासह इतर व्यक्तींच्या घर व कार्यालयावर आयकर विभागाकडून छापे मारण्यात आले होते. याच दरम्यान 28 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली असून मोशन पिक्चर्स , फँटम फिल्म, वेबसिरीज व दोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी ज्यामध्ये आंदोलन फिल्म्स व क्वाण टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा समावेश आहे.
तापसी पन्नू कडे मिळालेले पाच कोटींचे कॅश रिसिप्ट-
आयकर विभागाकडून फँटम, मोशन पिक्चर्स प्रोडक्शन हाऊसच्या संदर्भात छापेमारी करण्यात आलेली आहे. या कंपन्यांकडून 300 कोटी रुपयांच्या व्यवहाराबद्दल कुठलेही समाधानकारक उत्तर देण्यात आलेले नाही, असे आयकर विभागाकडून सांगण्यात आलेला आहे. तापसी पन्नू हिच्याकडून पाच कोटी रुपयांचं कॅश रिस्पिट आयकर विभागाला मिळालेली असून यासंदर्भात अधिक तपास सुरू असल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केलेले आहे.
ईमेल व्हाट्सअॅप चॅट व हार्ड डिस्कच्या माध्यमातून मिळाला डाटा-
अनुराग कश्यप, मधू वर्मा अँटेना व विकास बहल यांच्या झालेल्या चौकशीमध्ये आतापर्यंत 20 कोटी रुपयांचा कर संदर्भात आयकर विभाग तपास करत आहे. आयकर विभागाकडून 2 टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर मारण्यात आलेल्या छाप्या मध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल डाटा हा जप्त करण्यात आला. ईमेल व्हाट्सअॅप चॅट व हार्ड डिस्कच्या माध्यमातून हा डाटा मिळाल्याचा आयकर विभागाचा म्हणणे आहे.
या बरोबरच आयकर विभागाला सात बँक लॉकर मिळाले असून अजूनही तब्बल 28 ठिकाणी छापेमारी सुरू असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.
अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू का रडारवर?-
अनुराग कश्यप आणि टापसी पन्नू यांनी सध्या देशात सुरु असलेल्या मुद्द्यांवर प्रखर मत मांडले होते. तापसी पन्नूने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे समर्थक केले होते. जेव्हा पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाबाबत सोशल मीडियावर भाष्य केले तेव्हा बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी सरकारच्या बाजूने ट्विट केले होते. या सेलिब्रिटींविरोधात तापसी पन्नूने आपले मत व्यक्त केले होते. अनुराग कश्यप यांनी सीएएसारख्या मुद्द्यांवरून मोदी सरकारविरोधात भाष्य केले होते.
या फिल्म फॅन्टम कंपनीने बनवल्या -
फॅन्टम फिल्म्स कंपनीची पहिली फिल्म लुटेरा 2013 मध्ये रिलीज झाली होती. यानंतर हंसी तो फंसी, क्वीन, अगली, NH-10, हंटर, मुंबई वेलवेट, मसान, शानदार, उड़ता पंजाब, रमन राघव-2, रॉन्ग साइड राजू, मुक्केबाज, सुपर 30 आणि धूमकेतु यासारखे दर्जेदार फिल्म फॅन्टम कंपनीने बनवल्या होत्या.
या कलाकारांच्या घरावर छापा-