महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आरपीएफ जवानाने वाचवला प्रवाशाचा जीव; एलटीटी रेल्वे स्थानकातील घटना

रेल्वे सुरक्षा दलाने सांगितले की, आमचे आरपीएफ कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर आणि सर्तक असतात. अनेकदा आपला जीव धोक्यात घालून आजपर्यंत शेकडो प्रवाशांचे प्राण त्यांनी वाचले आहेत. आरक्षक मिलिंद पठारे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका प्रवाशाचा जीव वाचला असल्याची भूमिका रेल्वे स्पष्ट केली.

एलटीटी रेल्वे स्थानक
एलटीटी रेल्वे स्थानक

By

Published : Jun 8, 2021, 3:54 PM IST

मुंबई- मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर धावत्या रेल्वे गाडीत चढण्याचा प्रयत्न करण्याऱ्या एका प्रवासाचा रेल्वे जवानाने जीव वाचवला. फलाट आणि गाडी यांच्यातील मोकळ्या जागेत पडत असताना कर्तव्यावर असलेल्या रेल्वे जवानाने प्रसंगावधान दाखवून त्या प्रवासाचा जीव वाचवला. तसेच रेल्वे गार्डने गाडी थांबवून त्याला सुरक्षित ठिकाणी बसविण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावर घडलेली संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात टिपली गेली आहे.

आरपीएफ जवानाने वाचवला प्रवाशाचा जीव

अशी घडली घटना-

मिळालेल्या माहितीनुसार आज (मंगळवार) सकाळी 11 वाजताच्या दरम्यान मध्य रेल्वेच्या एलटीटी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रंमाक 3 वर ट्रेन क्रमांक 01055 एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस रवाना होत होती. यादरम्यान एक प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये बसत असताना त्या प्रवाशाचा तोल गेला आणि त्याचे संतुलन बिघडले. परिणामी ट्रेनच्या दरवाजाला अडकून फरफटत तो प्रवासी जात होता. तेव्हा कर्तव्यावर असलेले आरपीएफचे जवान आरक्षक मिलिंद पठारे यांनी एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेसकडे धाव घेतली. या प्रवाशाला बाजूला ओढले तसेच ऑन ड्युटी गार्डने प्रैशर ड्रॉप करत रेल्वे गाडी थांबवली. नंतर प्रवासाची विचारपूस करत त्याला तात्काळ मेल एक्सप्रेस मध्ये सुरक्षित चढवले. त्यामुळे त्या प्रवाशाचा जीव वाचलेला आहे. या प्रवाशाने आरपीएफचे जवानांचे आभार मानले आहे.

उत्कृष्ट कामगिरी-

रेल्वे सुरक्षा दलाने सांगितले की, आमचे आरपीएफ कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर आणि सर्तक असतात. अनेकदा आपला जीव धोक्यात घालून आजपर्यंत शेकडो प्रवाशांचे प्राण त्यांनी वाचले आहेत. आरक्षक मिलिंद पठारे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका प्रवाशाचा जीव वाचला असल्याची भूमिका रेल्वे स्पष्ट केली.

ABOUT THE AUTHOR

...view details